jitendra awhad  saam tv
महाराष्ट्र

तळीये येथील दरडग्रस्तांचे पुर्नवसन लांबणीवर, जितेंद्र आव्हाड यांनी दिली 'ही' माहिती

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तळीये येथे म्हाडाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

साम टिव्ही ब्युरो

रायगड : जिल्ह्यातील महाडच्या तळीये (Taliye landslide tragedy) येथे जुलै २०२१ मध्ये दरड कोसळून जवळपास ८७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झाली होती. महाड तालुक्यातील (Mahad) तळीये गावातील कोंडालकर वाडीतील बहुतांश घरे दरडीत गाडली गेली. या दुर्घटनेनंतर तळीये ग्रामस्थांच्या सुरक्षेचा आणि पुर्नवसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्य सरकारकडून (mva government) तळीयेच्या घटनेची दखल घेतली गेली पण अद्यापही पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. दरम्यान, तळीये येथील दरडग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी आणखी एक वर्ष लागणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी दिलीय. आव्हाड यांच्याकडून तळीये येथील कामांची पाहणी नुकतीच करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै 2021 मध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाड तालुक्यातील तळीये गावातील कोंडालकर वाडी पूर्णत: उध्वस्त झाली. दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत ८७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तसेच ६६ घरे दरडीत गाडली गेल्याने त्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर दरडग्रस्तांचे पुर्नवसन एका वर्षात करण्याचे आश्वासन राज्य सरकार कडून देण्यात आले होते. मात्र, या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही अद्याप पुनर्वसन झाले नाहीय.

जितेंद्र आव्हाड यांनी आज तळीये गावाला भेट दिली. यावेळी म्हाडाच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या 271 घरांच्या कामांची त्यांनी पहाणी केली. प्रस्तावित घरांबाबत प्रशासनाला सूचना करत वर्षभरात संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्याचे आदेश आव्हाड यांनी दिले आहेत. दरम्यान, आव्हाड यांनी दुर्घटनाग्रस्त ठिकाणी जाऊन मृतांना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर आव्हाडांनी वृक्षारोपणही केले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यासह रायगड चे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर ,म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन महाजन, सरपंच संपत तांदळेकर उपस्थित होते.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT