MHADA lottery saam tv
महाराष्ट्र

Nashik Mhada : प्राईम लोकेशन तब्बल ४०२ घरांसाठी लॉटरी, किंमत फक्त १४ लाख, वाचा A टू Z माहिती

Nashik Mhada Lottery News : नाशिकमध्ये म्हाडाच्या ४०२ घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. घरांच्या किंमती १४ ते ३६ लाखांपर्यंत आहेत.

Namdeo Kumbhar

MHADA Nashik Housing Lottery, Online Applications Open : नाशिककरांसाठी घर घेण्याची सुवर्णसंधी आली आहे. नाशिकमधील प्राईम लोकेशनवरील फ्लॅटची म्हाडाकडून लॉटरी काढण्यात आली आहे. घराची किंमत १४ लाखांपासून सुरू होतेय. अनेक वर्षांपासून स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी हक्काचे घर घेण्याची चांगली संधी असेल. म्हाडाकडून नाशिकमध्ये तब्बल ४०२ घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. निवासी सदनिका आगाऊ अंशदान (Advance Contribution) तत्वावर विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी म्हाडाकडून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीला सोमवारी सुरूवात करण्यात आली.

गो लाईव्ह कार्यक्रमाअंतर्गत 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते नाशिकमधील लॉटरीचा प्रारंभ करण्यात आला. नाशिकमधील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर या प्राईम लोकेशनच्या ठिकाणी असणाऱ्या ४०२ घरांसाठी लॉटरी काढण्यात आल्या. इच्छुक अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in अथवा https://mhada.gov.in या संकेतस्थळावर स्वप्नातील घरासाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

नाशिक मंडळाने जाहीर केलेल्या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी चुंचाळे शिवारात १३८ घरे, पाथर्डी शिवारात ३०, मखमलाबाद शिवारात ४८ सदनिका, आडगाव शिवारातील ३३ अशा एकूण 293 घरांच्या सोडतीचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी सातपूर शिवारात ४० सदनिका, पाथर्डी शिवारात ३५, आडगाव शिवारात ३४ अशा एकूण १०९ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १४,९४,००० ते ३६,७५ ०० यादरम्यान घरांच्या किंमती आहेत. घरासाठी अर्ज करताना अर्जदारास उत्पन्नाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे आयकर विवरणपत्र अथवा तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र यातील एक उत्पन्न पुरावा ग्राह्य धरले जाईल.

१ डिसेंबरपासून नाशिकमधील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येणार आहे. २३ डिसेंबर रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल. २४ डिसेंबरपर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरता येईल. ३० डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या काळात यादी प्रसिद्धीनंतर ऑनलाइन आक्षेप/ दावे-हरकती दाखल करता येणार आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी अंतिम यादीची प्रसिद्धी केली जाणार आहे.सोडतीची तारीख, वेळ आणि ठिकाण स्वतंत्रपणे ऑनलाइन जाहीर केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : भाजप आमदाराचा नवा लूक, नगरपालिकेत यश खेचून आणलं अन्..., वाचा नेमकं काय झालं

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

Railway Recruitment: रेल्वेत सर्वात मोठी भरती! २२००० पदांसाठी भरती; अट फक्त १० वी पास; अर्ज कसा करावा?

Mehandi Designs: नवरीच्या पायावर मेहंदी का काढतात?

Sugar Cookies Recipe: ख्रिसमससाठी खास, घरच्या घरी बनवा शुगर कुकीज, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT