Beed Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! स्वप्नील देशमुखची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

Swapnil Deshmukh Case: बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. स्वप्नील देशमुख या तरुणाची हत्या करण्यात आली असून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली.

Priya More

योगेश काशीद, बीड

बीडमध्ये जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरसाळा जवळील कान्हापूर गावात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून नवरा-बायकोने या तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली. स्वप्निल उर्फ बबलू देशमुख असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील कान्हापूर या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेने बीड जिल्हा पु्न्हा हादरला आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असतानाच बीडमध्ये आणखी एका देशमुखाची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. स्वप्नील देशमुख या तरुणावर संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख या दोघांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्वप्नीलचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कान्हापूर गावामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ वर्षांपूर्वी स्वप्निल उर्फ बबलू देशमुख याच्या त्रासाला कंटाळून गावातीलच किराणा दुकानदार अविनाश देशमुखने मार्च 2023 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी स्वप्नील देशमुखवर 306, 504, 506, 34 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील देशमुख हा अविनाश देशमुखचा भाऊ संतोष देशमुखवर सतत दबाव टाकत होता.

या रागातूनच अविनाश देशमुखचा भाऊ संतोष देशमुख आणि भावजयी सोनाली देशमुख यांनी स्वप्नील देशमुखवर जीवघेणा हल्ला करत त्याची हत्या केली आणि भावाच्या हत्येचा बदला घेतला. या हल्ल्यादरम्यान संतोष देशमुख आणि सोनाली देशमुख हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीवर वार करण्यात आले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांनी गुप्ती जप्त केली. स्वप्नील देशमुखची हत्या केल्यानंतर आरोपी संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख हे स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. या दाम्पत्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे ज्या झाडाला अविनाश देशमुखने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच झाडाखाली त्यांनी स्वप्नील देशमुखला संपवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

SCROLL FOR NEXT