Holi Special Train freepik
महाराष्ट्र

Holi Special Train: चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकण मार्गावर अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्यांची सोय, जाणून घ्या वेळापत्रक

Holi 2025: होळीच्या निमित्ताने कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करत असून, कोकणरेल्वेवरील सर्व गाड्या तुडूंब भरून धावत आहेत.

Dhanshri Shintre

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होळीच्या निमित्ताने गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. बहुतांश लोक रेल्वेने कोकणात जातात, ज्यामुळे कोकणरेल्वेवरील सर्व गाड्या तुडूंब भरून वाहत आहेत. याव्यतिरिक्त, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने सोडलेल्या विशेष गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे आणि या गाड्यांच्या तिकिटांची मागणी खूप वाढली आहे. त्यामुळे या विशेष गाड्यांची तिकिटे जवळपास संपत आलेली आहेत. होळीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही रेल्वे विभागांनी समन्वय साधत अधिक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांची संख्या अधिक होत आहे.

०६ मार्च आणि १३ मार्च रोजी गाडी क्रमांक ०११५१ सीएसएमटी ते मडगावपर्यंत विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन सीएसएमटी येथून मध्यरात्री १२.२० ला निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

१३ मार्च आणि २० मार्च रोजी गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावपर्यंत ही ट्रेन असेल. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.

६ मार्च आणि १३ मार्च रोजी गाडी क्रमांक ०११५२ मडगाव ते सीएसएमटीपर्यंत ही ट्रेन असेल. मडगाव येथून दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मध्यरात्री ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

१४ मार्च आणि २१ मार्च रोजी गाडी क्रमांक ०११३० मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही ट्रेन असेल. मडगाव येथून दुपारी १.४० वाजता सुटेल आणि पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

विशेष रेल्वेगाड्यांच्या तिकीटांची मागणी वाढली आहे आणि गर्दीचा भार कमी करण्यासाठी जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उधना जंक्शन-मंगळुरू मार्गावर जून महिन्यापर्यंत विशेष रेल्वेगाडी धावणार आहे. होळी आणि उन्हाळी हंगामादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेत अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

कोकण रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांसाठी विशेष शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०९०५७ / ०९०५८ उधना जंक्शन-मंगळुरू जंक्शन-उधना जंक्शन दरम्यान द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी धावेल. गाडी क्रमांक ०९०५७ ही ट्रेन २ मार्चपासून सुरू झाली आहे आणि २९ जूनपर्यंत धावणार आहे. ही ट्रेन दर बुधवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता उधना जंक्शनहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharat Case: ५८ नव्हे खरातचे १०० व्हिडिओ सापडले, SIT च्या तपासात धक्कादायक माहिती

Maharashtra Live News Update: शिर्डीत कॅप्टन अशोक खरात याच्या पत्नीच्या नावे आणखी एक मालमत्ता

Viral wedding video: नवऱ्याचा हटके स्टाइल पाहून लोक थक्क, लाईट्सच्या ड्रेसमुळे व्हिडिओ झाला व्हायरल

साताऱ्यात भाजपनं बाजी फिरवली, ZP चं अध्यक्ष अन् उपाध्यपद मिळवलं; शिंदेसेना अन् राष्ट्रवादीचे सदस्य फोडले|VIDEO

Indian Rupee: रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत निचांकी पातळीवर, भारतात महागाई वाढणार?

SCROLL FOR NEXT