Pandharpur, Sangola, Holar Samaj Andolan, Kolhapur - Pandharpur Highway Rasta Roko Andolan saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : आषाढी महापूजेसाठी येणा-या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार : हाेलार समाजाचा इशारा

सांगाेल्यात हाेलार समाजाने छेडलं आंदाेलन.

भारत नागणे

Pandharpur News : दुर्लक्षित असलेल्या होलार समाजाच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी होलार समाजाचे नेते शिवाजी जावीर यांच्या नेतृत्वाखाली आज (साेमवार) सांगोला येथे कोल्हापूर - पंढरपूर मार्गावर (kolhapur pandharpur marg) रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतुक खाेळंबली. (Maharashtra News)

होलार समाजाचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, होलार समाज अभ्यास आयोगाची स्थापना करावी, अक्षय भालेरावच्या खुन्याला फाशी द्यावी ,नितीन रणदिवे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा यासह इतर प्रमुख मागण्यासाठी पंढरपूर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदाेलनात माेठ्या संख्येने हाेलार समाजातील समाज बांधव सहभागी झाले हाेते. (pandharpur latest marathi news)

या आंदाेलनामुळे सुमारे तासभर काेल्हापूर पंढरपूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आषाढीपूर्वी (ashadhi ekadashi) समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आषाढी महापूजेसाठी येणा-या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करू असा इशारा होलार समाजाचे नेते शिवाजी जावीर यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT