Amol Kolhe Saam TV
महाराष्ट्र

Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हेंचा CM शिंदेंना अल्टिमेट...; पुढील वर्षी शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा न दिसल्यास उचणार मोठं पाऊल

शिवजन्मोत्सवाच्या शासकिय कार्यक्रमावर खासदार कोल्हेंनी बहिष्कार घातल आहे.

साम टिव्ही ब्युरो

रोहिदास गाडगे

Amol Kolhe : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव किल्ले शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात साजरा होतोय मात्र ज्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडावर जन्मोत्सव साजरा होतोय त्याच ठिकाणी भगवा ध्वज नाही, अशी खंत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)

आज सर्वत्र मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. या निमित्त लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी किल्ले शिवनेरीवर भेट देण्यासाठी येत असतात. अशात शिवजन्मोत्सवाच्या शासकिय कार्यक्रमावर खासदार कोल्हेंनी बहिष्कार घातल आहे. किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज नसल्याने खंत व्यक्त करत याची जाणीव करुन देण्यासाठी हे आंदोलन उभं केलंय याला शिवभक्तांमधूनही चांगला प्रतिसाद मिळतोय.

कोल्हे गडाच्या मध्यावर बसले आहेत. तसेच शासकीय कार्यक्रम संपल्यानंतर शिवभक्तांमधून ते शिवनेरी गड चढणार आहेत. पुढचे तीन तास कोल्हे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याच्या पहिल्या पायरीवर बसणार आहेत.

राज्य व्यापी आंदोलनाचा इशारा

पुढल्या शिवजयंतीला शिवनेरीवर भगवा नसेल तर, राज्य व्यापी आंदोलन केले जाईल. राज्य सरकारने यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन क्रेंद्रशासनातून यासाठी लवकरात लवकर परवानगी मिळवावी. जे सरकार कलम ३७० हटवतं तर आर्केलॉजीकल सर्वे ऑफ इंडियाच्या नियमामध्ये एक छोटा बदल करून भगवा का फडकवू शकत नाही?, असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी भगवा फडकवला जावा याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारने त्या दिशेने ठोस पाऊलं उचलेली नाहीत. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी आता राज्यशासनाला पुढील शिवजयंती पर्यंतचा अल्टीमेट दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

Free Bike For Aadhaar Card Holders: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग

Parth Pawar: पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Why do Medu Vada have a hole: मेदू वड्याला मधोमध होल का पाडतात? जाणून घ्या रंजक कारण

SCROLL FOR NEXT