Hingoli Viral Video Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Viral Video: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मुलाला आईनंच पोलिसांसमोर चोपून काढलं, VIDEO बघा!

Hingoli Viral Video: हिंगोलीत एका आईने आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला चांगलाच चोप दिला आहे. मुलाने सोशल मीडियावर समाजातील वातावरण बिघडवणारी पोस्ट केली होती. त्यामुळेच आईने मुलाला मारले आहे.

Siddhi Hande

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.राज्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना, वादग्रस्त वक्तव्य किंवा आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने अनेकदा राडा झाल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता एका आईने मुलाच्या भल्यासाठी त्याला चांगला चोप दिला आहे.आपला मुलगा चांगला व्हावा, त्याने काही वाईट काम करु नये म्हणून एका आईने पोलिस कर्मचारी आणि गावकऱ्यांसमोर आपल्या मुलाला चांगला चोप दिला आहे. औंढा तालुक्यातील केळी गावातील ही घटना आहे.

दिवेश सखााम सहदराव याने काहीतरी वादग्रस्त कमेंट केली होती. यामुळे गावात भांडणे होऊ शकली असती. दिवेशने सोशल मिडिया अकाउंटवर सामाजिक वातावरण दूषित करणारी कमेंट केली होती. ही गोष्ट दिवेशच्या आईला कळताच तिने मुलाला चांगलाच चोप दिला आहे.

दिवेशची आई आणि मोठा भाऊ संदेश यांनी दिवेशला चांगलेच मारले आहे. गावातील सामाजिक सलोख बिघडवण्याचा प्रयत्न दिवेशने केला होता. मात्र, मुलाने पुन्हा कधीच असं कृत्य करु नये यासाठी त्याला पोलिस आणि गावकऱ्यांसमोर मारले आहे.

आपण ज्या गावात मोठे झालो, ज्या गावात संपूर्ण बालपण गेले, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी असतो. परंतु तुझ्या अशा वागणुकीमुळे गावातले वातावरण बिघडलंय, असं दिवेशच्या आईने सांगितले.

यानंतर आईने दिवेशला काम पकडून सर्वांची माफी मागायला लावली. केळी गावातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गावातील एकोपा आणि सामाजिक सलोख राखण्यासाठी आईने कठोर पाऊल उचलले आहे. या गोष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT