संदीप नागरे, हिंगोली प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
Hingoli Kalamnuri firing latest news : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांतील जुन्या वादातून भीषण गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात एका ३८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे, शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी हा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी दोन नगरसेवकांसह एकूण १६ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
हिंगोलीच्या कळमनुरीत मध्यरात्री दोन गटांत किरकोळ वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. या गोळीबाराच्या घटनेमध्ये ३८ वर्षीय सिद्दीकी या तरुणाचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सेनेचे नगरसेवक फयुम नाईक, किशोर भालेराव यांच्यासह एका महिला नगरसेविकेच्या पतीने मिळून हा गोळीबार केला. वाद विकोपाला गेल्यानंतर थेट गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर कळमनुरी शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत गोळीबार करणाऱ्या दोन्ही नगरसेवकांसह एकूण १६ जणांविरोधात हत्येचा (कलम ३०२ अंतर्गत) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.