Hingoli Saam
महाराष्ट्र

Accident News: लग्नाच्या आदल्या दिवशी काळाचा घाला, अज्ञात वाहनाच्या धडकेत नवरदेवाचा मृत्यू

Groom killed in road accident Hingoli: लग्नाच्या २ दिवस आधीच एका तरूणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडवले. नंतर वाहनचालक फरार झाला आहे.

Bhagyashree Kamble

संदीप नागरे, साम टीव्ही

हिंगोलीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. लग्नाच्या २ दिवस आधीच एका तरूणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. तरूण दुचाकीवरून जात असताना एका वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला. नंतर वाहनचालक फरार झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चकनाचूर झाला आहे. या घटनेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. फरार वाहनचालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव रस्त्यावर एक भीषण अपघात घडला आहे. आज सकाळी अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. गणेश तनपुरे असे मृत तरूणीचे नाव आहे. तो सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी गावचा रहिवासी होता. गणेश याचा २ दिवसानंतर विवाह सोहळा असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

मात्र, लग्नाच्या २ दिवस आधीच गणेशचा अपघाती मृत्यू झाला आहे. तरूण दुचाकीवरून जात होता. यादरम्यान, एका अज्ञात वाहनाने त्याला जबर धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पलायन करत असताना वाहन चालकाने त्याला दोनशे फूट फरफटत नेले.

फरफटत नेल्यामुळे तरूणाचा जागीच मृत्यू झाला आणि दुचाकीचेही अनेक भाग रस्त्यावर पडले होते. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करीत आहेत. तसेच फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलाकरांना मारहाण

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

Kundali Matching Tips For Marriage: लग्नासाठी मुला- मुलीचे किती गुण जुळले पाहिजेत?

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

SCROLL FOR NEXT