Crime Nashik: नाशकात पुन्हा गुंडगिरी! २ भावडांना हॉटेलमध्ये मारहाण, हल्ला करत ६-७ जणांनी भावडांना झोडलं; VIDEO व्हायरल

Hotel owners attacked in Nashik: नाशिकमध्ये २ भावडांना ६-७ जणांनी मिळून मारहाण केली आहे. या मारहाणीत दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.
Nashik
NashikSaam
Published On

नाशिकमध्ये गुंडगिरी वाढत चालली आहे. २ भावडांना धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याचा प्रकार ताजे असतानाच आणखी २ भावडांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दोन्ही भाऊ हे हॉटेल मालक आहेत.

बिलाचे पैसे मागितल्याच्या रागातून २ भावडांवर गावगुंडांनी मारहाण केली आहे. या मारहाणीत दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकच्या सातपूर परिसरात २ भावडांवर गावगुंडांनी प्राणघातक केला आहे. ६ ते ७ जण हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर दोघा भावडांनी गावगुंडांकडे पैसे मागितले. पैसे मागितल्याचा राग गावगुंडांना आला. त्यांनी दोघा भावडांवर मारहाण करायला सुरूवात केली. 'हॉटेल कसे चालवतो ते बघतोच' अशी धमकी देत त्यांनी भावडांवर हल्ला केला.

Nashik
Shocking Crime: "आज नको ना.."बेडवर बायकोने संबंध ठेवण्यास दिला नकार, नवऱ्याची सटकली थेट जीवच घेतला

या मारहाणीत दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचा थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपींविरोधात नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Nashik
Disha Salian: 'फोन कॉल तपासा, सत्य बाहेर येऊ द्या', दिशा सालियान प्रकरणी नरेश म्हस्के काय म्हणाले?

यापूर्वी देखील संशयितांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींविरोधाक कठोर कारवाई करावी, तसेच आरोपींना अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com