Hingoli Crime news Saam Tv News
महाराष्ट्र

धक्कादायक! बायकोचे विवाहबाह्य संबंध, नवऱ्याला खटकलं, प्रियकरासोबत पत्नीनं काटा काढला

Hingoli Crime news: हिंगोलीत विवाहबाह्य संबंधामुळे पतीचा खून झाल्याची धक्कादायक घटना. पत्नी मंगल पोटे आणि तिचा प्रियकर ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी कट रचून खून केला. मृतदेह शेताजवळील नाल्यात फेकण्यात आला होता.

Bhagyashree Kamble

  • हिंगोलीत विवाहबाह्य संबंधामुळे पतीचा खून झाल्याची धक्कादायक घटना.

  • पत्नी मंगल पोटे आणि तिचा प्रियकर ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी कट रचून खून केला.

  • मृतदेह शेताजवळील नाल्यात फेकण्यात आला होता.

  • पोलिस तपासात पत्नीनं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दोघांनाही अटक.

पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना हिंगोलीमधून उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधामध्ये नवरा अडथळा ठरत असल्याकारणानं बायकोनं प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं. नंतर नवऱ्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. पोलीस तपासात पत्नीनं गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नीसह प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर हिंगोली हादरली.

शिवाजी पोटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोटे हिंगोलीतील औंढा तालुक्यातील कुरूंदा गावातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पोटे हे त्यांचं कुटुंब घेऊन भेंडेगाव परिसरात सालगडी म्हणून शेतात काम करायचे. पत्नी मंगल आणि त्यांची दोन मुलेही त्यांच्यासोबत काम करत असे.

शिवाजी यांची मुलं शिरड शहापूर येथील शाळेत शिक्षण घेत होते. मुलांना दररोज शाळेत सोडण्यासाठी त्यांची पत्नी मंगल पोटे ही जात असे. दरम्यान, शाळेतील स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या ज्ञानेश्वर ठोंबरे याच्यासोबत मंगलचं प्रेमप्रकरण जुळलं. सुरूवातीला त्यांची दररोज भेट व्हायची. हळूहळू त्यांच्यातील संवाद वाढला. नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

मंगला आणि ज्ञानेश्वर यांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण शिवाजी यांना लागताच, त्यांनी या नात्याला विरोध केला. दररोज शिवाजी आणि मंगलामध्ये भांडणं होत. प्रियकरासोबत असलेल्या प्रेमसंबंधाला विरोधा करत असल्यानं पत्नीनं पतीला संपवण्याचा कट रचला. मंगला आणि तिच्या प्रियकरानं शिवाजी यांना शेत शिवारात असलेल्या आखाड्याबाहेर बोलाऊन घेतलं.

नंतर त्यांच्या डोक्यात लाकडाने वार करत जखमी केलं. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नंतर दोघांनी मिळून शिवाजी यांचा मृतदेह परिसरातील नाल्यात फेकून दिला. यानंतर पत्नीने मुलांना वडील हरवले असल्याचं सांगितले. याप्रकरणाची माहिती कुरूंदा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली.

तपासात पत्नीनं विवाहबाह्य संबंधामुळे शिवाजी यांचा काटा काढला असल्याचं कबुल केलं. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीसह प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Santosh Juvekar: हिंदी नाटक करतोय उद्या हिंदी चित्रपटही...; संंतोष जुवेकरच्या वडिलांनी व्यक्त केली खास इच्छा

Maharashtra Live News Update: गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा देविदास गायकवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Shocking: संतापजनक! गायिकेवर सामूहिक बलात्कार, खोटंनाटं सांगून लॉजवर बोलावून घेतलं अन्...

Hair Mask: किचनमधील 'या' ३ गोष्टींपासून बनवा हेअर मास्क, केस होतील मजबूत

Tuesday Horoscope : आज सावध रहा… विश्वासूच देऊ शकतात धोका; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT