police,  arrests, hingoli, bhivandi, farmers
police, arrests, hingoli, bhivandi, farmers Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli News : हिंगोलीतील शेतकऱ्यांचा शेत माल चोरणारी टोळी भिवंडीत गजाआड

संदीप नागरे

Hingoli News : हिंगोली पोलिसांनी (hingoli police) शेतकऱ्यांचा (farmers) शेतमाल चोरून काळया बाजारात विक्री करणाऱ्या टोळीच्या मुस्क्या आवळल्या आहेत. हिंगोली शहरासह आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात शेतमाल चोरून नेल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले होते. (Maharashtra News)

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना आंध्रप्रदेश व महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा माल चोरणारी टोळी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मुंबईच्या भिवंडी (bhivandi) येथून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेत हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

पोलिसांनी शेतकऱ्यांचा चाेरी केलेला ४२ क्विंटल हरभरा संशयितांकडून जप्त केला आहे. दरम्यान अन्य संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती पंडित कच्छवे (पोलीस निरीक्षक) यांनी दिली. अन्य संशयितांना लवकरच अटक करु अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : माढ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का?; शरद पवारांचे कट्टर समर्थक भाजपच्या वाटेवर

Maharashtra Politics: मराठी उमेदवार मिळत नसेल तर मुंबईतल्या 3 जागा बिनविरोध करा; शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांची फडणवीसांना पत्राद्वारे मागणी

Narayan Rane Vs Uddhav Thackeray: बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं ही उद्धव ठाकरेंची पोटदुखी : नारायण राणे

Today's Marathi News Live : बोरिवलीत रुग्णालयाला आग, काहीजण जखमी झाल्याची माहिती

UP News: धनंजय सिंहला इलाहाबाद हायकोर्टचा दणका; अपहरण प्रकरणात शिक्षा कायम, खासदारकीचं स्वप्न भंगलं

SCROLL FOR NEXT