Hingoli Parbhani Accident News  Ai Image
महाराष्ट्र

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! रिक्षा आणि पिकअपची जोरदार धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू; ५ जण गंभीर

Hingoli Accident News : हिंगोली-परभणी राज्य मार्गावर ऑटो रिक्षा आणि पिकअप वाहनाच्या भीषण धडकेत दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू झाला. तर ५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी असून काहींची प्रकृती गंभीर आहे.

Alisha Khedekar

  • हिंगोली-परभणी राज्य मार्गावर ऑटो रिक्षा आणि पिकअप वाहनाची भीषण धडक

  • या अपघातात दोन लहान मुलांसह तिघांचा घटनास्थळीच मृत्यू

  • ५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून काही जखमींची प्रकृती गंभीर

हिंगोली-परभणी राज्य मार्गावर मंगळवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास प्रवासी ऑटो रिक्षा आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातात पाचपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, औंढा येथून परभणीकडे प्रवाशांना घेऊन एक ऑटो रिक्षा जात होती. याच दरम्यान हिंगोली-परभणी राज्य मार्गावर ऑटो रिक्षाची पिकअप वाहनाला जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ऑटो रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात ऑटोमधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमी प्रवाशांना ऑटोमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपघातातील मृत आणि जखमी प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम स्थानिक पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची प्राथमिक माहिती नोंदवली आहे. या दुर्घटनेप्रकरणी संबंधित वाहनचालकांची माहिती घेतली जात असून, नेमका अपघात कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन बालकांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. अपघातामागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer Death : जादुई आवाज हरपला! प्रसिद्ध गायकाचे निधन, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: "बापट जाऊ द्या ना", अखेर विद्यानंद बापट यांच्यावर रॅप साँग प्रदर्शित

शहरात राहणाऱ्या नोकरदारांची लॉटरी! केंद्र सरकारची मोठी घोषणा; घरांसाठी सुरू केली 'ही' योजना

Traffic News: घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडी कमी होणार; गायमुख-पायेगाव खाडी पुलाच्या पायलिंगचं ९५ टक्के काम पूर्ण

पुणेकरांनो सावधान! भाडेकरू ठेवलाय पण 'हे' एक काम केलं नाही? घरमालकाला थेट कोर्टाची शिक्षा

SCROLL FOR NEXT