Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : महावितरणच्या कारभाराने तरुणाचा बळी; वीजपुरवठा सुरू असताना चढविले खांबावर

Hingoli : सावळी गावात विजेची दुरुस्ती करण्याची जबाबदारी असलेल्या एका वायरमनने गावातीलच झिरो वायरमन असलेला तरुण विठ्ठल देमगुंडे याला विजेच्या खांबावर काम करण्यासाठी चढविले

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात विद्युत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार तरुणाच्या जीवावर बेतला आहे. विद्युत खांबावर काम करण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांनी तरुणाला वीजपुरवठा सुरू असताना खांबावर काम करण्यासाठी चढण्यास सांगितले. खांबावर काम करत असताना या तरुणाला विजेचा जोरदार झटका बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील सावळी गावात सदरची घटना घडली आहे. या घटनेत विठ्ठल देमगुंडे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सावळी गावात विजेची दुरुस्ती करण्याची जबाबदारी असलेल्या एका वायरमनने गावातीलच झिरो वायरमन असलेला तरुण विठ्ठल देमगुंडे याला विजेच्या खांबावर काम करण्यासाठी चढविले. यावेळी सदरच्या विद्युत खांबावरील तारेत विद्युत पुरवठा सुरु होता. 

विजेचा झटका बसल्याने खांबावरून कोसळला 

दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्याने विद्युत खांबावर काम करण्यास सुरवात करण्यापूर्वी विद्युत पुरवठा बंद करायला सांगायचं विसरला. यातच खांबावर चढलेला या तरुणाला विजेचा जोरदार झटका बसला. यामुळे विठ्ठल हा जमिनीवर कोसळला. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सदरच्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. 

नातेवाईकांनी मृतदेह नेला महावितरण कार्यालयात 

दरम्यान या घटनेनंतर वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह हिंगोलीच्या विद्युत कार्यालयात दाखल केला होता. यामुळे महावितरणच्या कार्यालयात गोंधळ उडाला होता. दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सदर कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी हा मृतदेह अंत्यविधीसाठी गावाकडे पाठवला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT