Hingoli Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Water Crisis : वाढत्या तापमानाने विहिरीतील झरे आटले; बागायतदार शेतकरी संकटात, हिंगोली जिल्ह्यात भीषणता

Hingoli News : उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर तलाव, धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठ्यात घट. याचा परिणाम जमिनीतील पाण्याचे झरे आटण्यावर देखील होत असल्याने विहिरी कोरड्या पडल्याचे पाहण्यास मिळते

संदीप नागरे

हिंगोली : वाढत्या उन्हात पाण्याची समस्या सर्वत्र बिकट होत चालली आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या वर्षी अभूतपूर्वक पाणीटंचाईचा संकट जाणवायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मुळात उन्हाची तीव्रता वाढली असताना जमिनीतील पाण्याचे झरे आटल्याचे चित्र पाहण्यास मिळत असल्याने बागायतदार शेतकरी संकटात सापडला आहे.  

पाऊस कमी झाल्याने पुरेसा पाणीसाठा होत नाही. यात उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर तलाव, धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठ्यात घट निर्माण होत असते. याचा परिणाम जमिनीतील पाण्याचे झरे आटण्यावर देखील होत असल्याने विहिरी कोरड्या पडल्याचे पाहण्यास मिळते. हीच परिस्थिती हिंगोली जिल्ह्यात निर्माण झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह पिकांना पाणी देण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. 

दीडशेपेक्षा अधिक गावात समस्या 

जिल्ह्यातील औंढा, कळमनुरी व हिंगोली या तीन तालुक्यातील दीडशे पेक्षा अधिक गावच्या शेत शिवारात असलेले पाण्याचे स्त्रोत कोरडे ठाक पडले आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या मे महिन्यापर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरू राहणारे विहीर बोरवेल मधील पाण्याचे झरे यंदाच्या वर्षी मात्र मार्च महिन्यातच आटले आहेत. यामुळे बागायतदार शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.   

एक किलोमीटरची पाईपलाईन टाकून पर्याय 

दरम्यान या शेतकऱ्यांनी आता पर्यायी उपाय शोधायला सुरुवात केली असून एक किलोमीटर अंतरावरून जलवाहिनी टाकून विहिरीत पाण्याची साठवणूक करायला सुरुवात केली आहे. यामुळे किमान तीव्र उन्हात पिकांना पाणी देता येणे शक्य होणार आहे. आता हा पर्याय किती दिवस पिकांना पाणी देता येईल; हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT