Hingoli Congress Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Congress : हिंगोलीत काँग्रेसची अंतर्गत गटबाजी उफाळली; आढावा बैठकीत दोन गट एकमेकांना भिडले

संदीप नागरे

हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची तयारी सुरु केली आहे. यासाठी बैठक देखील घेतल्या जात आहेत. अशाच प्रकारे हिंगोली काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीदरम्यान दोन गट एकमेकात भिडले- यावेळी दोन्ही गटांमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार देखील घडला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीसाठी (Hingoli) हिंगोलीत काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीत अंतर्गत गटबाजीतून काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे, हिंगोली शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी पवन उपाध्ये यांना या बैठकीत मारहाण देखील करण्यात आली आहे, (Congress) काँग्रेसचे पक्ष निरीक्षक कुणाल चौधरी व विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यापुढेच हा राडा झाला आहे.  

दरम्यान हिंगोली विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असलेल्या प्रकाश थोरात यांच्या मुलासह कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसचे पदाधिकारी पवन उपाध्ये यांनी केला आहे. या घटनेनंतर हिंगोली पोलिसांनी तातडीने बैठकीच्या ठिकाणी धाव घेत काँग्रेस कार्यकर्त्यांचं भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पुण्यातील पेठ परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

Nashik Crime : पतीच्या लटकत्या मृतदेहाखाली पत्नीची दुर्गापूजा? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Maharahstra Politics: रश्मी ठाकरे भावी मुख्यमंत्री; मातोश्रीच्या परिसराबाहेरील बॅनरमुळे चर्चांना उधाण

Chess Olympiad: भारत बनला चॅम्पियन; पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदक जिंकत रचला इतिहास

Mumbra building slab collapse : मुंब्र्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, ५ वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT