Accident News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Accident: डुलकी लागली अन् अनर्थ घडला... भरधाव आयशरची ट्रकला धडक; चालकाचा जागीच मृत्यू

Hingoli Washim Highway Accident: हिंगोली- वाशिम राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला.

संदीप नागरे

Hingoli Accident News:

हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. हिंगोली- वाशिम राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला. हिंगोलीच्या माळहिवरा गावाजवळ ही दुर्घटना घडली असून चालकाची डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ( Hingoli Washim Accident)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, हिंगोली (Hingoli) वाशिम राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. नागपूरमधून संत्री घेऊन निघालेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हिंगोलीच्या माळशिवरा गावाजवळ ही दुर्घटना घडली. यामध्ये आयशर चालक शेख अनवर शेख कटूमिया हे जागीच ठार झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व हिंगोली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत चालकाला रुग्णालयात क्षवविच्छेदनासाठी दाखल केले आहे अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतुक कोंडीही झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमध्ये अपघातग्रस्त दोन्ही ट्रक व संत्र्याच्या मालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

झारखंडमधील गिरिडीहमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. लग्न समारंभ आटोपून परतत असताना भरधाव वेगात असलेली कार झाडावर आदळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये  दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT