Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : एकाच ट्रकमध्ये ४२ जनावरांची कोंबून अवैध वाहतूक; हिंगोलीत पोलिसांनी कारवाई करत सुटका

Hingoli News : समृद्धी महामार्गावरून गाईंची तस्करी केल्याच्या प्रकरणाला आठवडाभराचाच कालावधी उलटला आहे. असे असताना हिंगोलीमध्ये देखील राष्ट्रीय महामार्गावर गाईंची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

संदीप नागरे

हिंगोली : मुख्य जनावरांना ट्रकमध्ये निर्दयीपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. असाच प्रकार पुन्हा एकदा (Hingoli) हिंगोलीत समोर आला असून एकाच वाहनात ४२ गायींना कोंबून वाहतूक केल्याचे  आहे. (Police) पोलिसांनी कारवाई करत या गायीची सुटका केली आहे.  (Latest Marathi News)

समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) गाईंची तस्करी केल्याच्या प्रकरणाला आठवडाभराचाच कालावधी उलटला आहे. असे असताना हिंगोलीमध्ये देखील राष्ट्रीय महामार्गावर गाईंची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच ट्रकमध्ये ४२ जनावरांची निर्दयीपणे वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती हिंगोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे माळहिवरा पाटीजवळ पोलिसांनी (Hingoli Police) गाईंची वाहतूक करण्यात येत असलेला ट्रक ताब्यात घेऊन कार्यवाही केली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी सदरची कारवाई करत गाईंची सुटका केली आहे. ट्रकमधून ही सर्व जनावरे आंध्र प्रदेशमध्ये कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT