Hingoli Zilha Parishad : सीईओंच्या दालनात विद्यार्थ्यांनी भरवली शाळा; काही वेळातच शाळेला मिळाले शिक्षक

Hingoli News : जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था बिकट होत चालली आहे. शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या हा गंभीर विषय आहे. तर काही शाळांवर विद्यार्थी संख्या बऱ्यापैकी असताना त्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याचे देखील चित्र पाहण्यास मिळते.
Hingoli Zilha Parishad
Hingoli Zilha ParishadSaam tv
Published On

हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवण्यासाठी (Hingoli) शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सीईओच्या दालनात शाळा भरवली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडल्यानंतर सीईओनी लागलीच शिळेवर शिक्षकाची नेमणूक केली. (Maharashtra News)

Hingoli Zilha Parishad
Wardha News : कारंजात चार दुकानांना आग; टीव्ही, मोबाईलसह साहित्याचा कोळसा

जिल्हा परिषदेच्या शाळांची (Zp School) अवस्था बिकट होत चालली आहे. शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या हा गंभीर विषय आहे. तर काही शाळांवर विद्यार्थी संख्या बऱ्यापैकी असताना त्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याचे देखील चित्र पाहण्यास मिळते. असाच प्रकार हिंगोली जिल्ह्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक नाही. यामुळे (Student) विद्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समोर आले होते. यामुळे आज शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेत (Zilha Parishad) येत सीईओंच्या दालनातच आंदोलन सुरु केले. 

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hingoli Zilha Parishad
Amravati Crime : मार्डीच्या गुरुदासबाबाचा आणखी एक कारनामा आला समोर; महिलेवर ३ महिने अत्याचार करत बनविली चित्रफीत, पोलिसात गुन्हा दाखल

विद्यार्थ्यांनी सीईओंच्या दालनात आंदोलन करत शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जिल्हा परिषद कार्यालयात बे एक बेचा पाढा म्हणण्यास सुरवात केली. चिमुकल्याच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी तातडीने शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com