Amravati Crime : मार्डीच्या गुरुदासबाबाचा आणखी एक कारनामा आला समोर; महिलेवर ३ महिने अत्याचार करत बनविली चित्रफीत, पोलिसात गुन्हा दाखल

Amravati News : पतीला व्यसनमुक्त करण्यासाठी पुढील काही महिने आश्रमातच मुक्कामी राहावे लागेल; असे तिला सांगण्यात आले.
Amravati Crime
Amravati CrimeSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील स्वयंघोषित गुरुदासबाबा उर्फ सुनील कावलकर याने मध्यप्रदेशातील एका भक्त महिलेवर तीन महिने अत्याचार केला. इतकेच नाही तर मोबाइलमध्ये (Amravati) अश्लील चित्रफीत बनविली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांत गुरुदासबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Amravati Crime
Aasha Sevika Strike : आशा सेविकांचे काळ्या साड्या घालत चटणी भाकर आंदोलन; सरकार विरोधात घोषणाबाजी

पतीला व्यसनाधीनतेतून मुक्त करण्यासाठी मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूर येथील ३४ वर्षीय महिला २ मे २०२३ रोजी बाबाच्या मार्डी येथील (Crime News) आश्रमात आली होती. पतीला व्यसनमुक्त करण्यासाठी पुढील काही महिने आश्रमातच मुक्कामी राहावे लागेल; असे तिला सांगण्यात आले. सदर महिलेने आश्रमात राहण्याची तयारी दर्शवली. यादरम्यान तीन महिन्यांपर्यंत भोंदूबाबाने तिच्यावर सतत अत्याचार करून लैंगिक शोषण केले. लग्नाचेही अमिष दाखविले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati Crime
Sangli Crime: छेड काढणे पडले चांगलेच महागात; तरुणाला चोप देत तरुणीने नेले पोलिसात 

दुष्कृत्यानंतर झाला फरार

दरम्यान एक दिवस महिलेला मोबाइलमध्ये त्याने केलेल्या कुकर्माची चित्रफीत दिसली. तिने जाब विचारला असता, गुरुदासबाबाने दमदाटी करून महिलेला धमकावले. यानंतर २ जानेवारीला महिलेला नागपूरला सोडून फरार झाला.

Amravati Crime
Wardha News : कारंजात चार दुकानांना आग; टीव्ही, मोबाईलसह साहित्याचा कोळसा

आधी गाजला गरम तवा

काही महिन्यांपूर्वी याच भोंदू सुनील कावलकरने गरम तव्यावर बसून लोकांच्या समस्या सोडवित असल्याचा व्हिडीओ जारी केला होता. त्याबाबत चौकशी होताच चारधामच्या बहाण्याने तो पसार झाला होता. यादरम्यान महिलेवर अत्याचार करून तो पुन्हा फरार झाला आहे. पहिल्या प्रकरणातच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुरुदासबाबावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हाच त्याच्या मार्डी आश्रमातून कुऱ्हा पोलिसांनी अटक का केली नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com