Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : पक्ष कोणताही असो ओबीसी उमेदवारालाच विजयी करणार; हिंगोलीत ओबीसी समाजाचा ठराव

Hingoli News : हिंगोली लोकसभेत पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा ही राजकीय लढत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संदीप नागरे


हिंगोली
: आगामी लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत राजकीय पक्षांचे गट पडले (Lok Sabha) असताना, आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो केवळ ओबीसी उमेदवाराला मतदान करून विजयी करा; असे आवाहन करत हिंगोलीत (Hingoli) ओबीसी समाजाने एकमताने ठराव पारित केला आहे. (Live Marathi News)

हिंगोली येथे ओबीसी जनमोर्चाच्या वतीने बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) दृष्टीने विषय करून पक्ष कोणताही असो (OBC) ओबीसी उमेदवार उभा राहिल्यास आम्ही मोठ्या मताधिक्याने विजयी करू. असा विश्वास देखील ओबीसी नेत्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओबीसी उमेदवाराच्या पाठीमागेच उभे 

महायुतीमध्ये हिंगोली लोकसभेच्या जागेवरून सुरू असलेल्या खडाजंगीत आमदार संतोष बांगर यांना हिंगोली लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी उमेदवारी दिल्यास आम्ही एकमताने ओबीसी उमेदवाराच्या पाठीमागे राहू; असे देखील यावेळी ओबीसी समाजाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभेत पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा ही राजकीय लढत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

Tapola Tourism : महाबळेश्वरपासून हाकेच्या अंतरावर वसलय हिडन हिल स्टेशन पाहा काश्मिरसारखे सौंदर्य क्षणात

SCROLL FOR NEXT