हिंगोली : यंदा कमी पावसाळ्यामुळे महाराष्ट्रासह मराठवाड्यातील नागरिक सध्या भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. (Water Crisis) वाढत्या तापमानामुळे पाण्याचे स्त्रोत व तलाव कोरडे ठाक पडल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असताना आता (Hingoli) हिंगोली जिल्ह्यातील सिध्देश्वर येलदरी ईसापुर धरणातील पाणी पातळी मृतावस्थेत गेली आहे.
पावसाळा चांगला झाल्यास दरवर्षी याच सिद्धेश्वर धरणातून परभणीसह (Nanded) नांदेड व हिंगोली शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र यंदा कमी पाऊस (Rain) झाल्याने पाण्याच्या प्रश्न गंभीर होत चालला आहे. आता उन्हाळा संपायला महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाच धरणातील (siddheshwar Dam) पाणी पातळी प्रचंड वेगाने घटक चालल्याने प्रशासनासह नागरिकही हैराण झाले आहेत.
पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
सिध्देश्वर येलदरी ईसापुर धरणातील पाणीसाठा वाढत्या तापमानामुळे घटला आहे. चिंतेची बाब म्हणजे सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी मृत अवस्थेत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे या धरणांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टरवरील बागायती पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. दरम्यान नागरिकांनी पुढील महिनाभर पाण्याचा काटकसरीने वापर करावा असा आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.