Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli PDCC Bank : पीडीसीसी बँकेत मारहाण प्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल; शेतकरीही करणार तक्रार

Hingoli News : हिंगोलीच्या पीडीसीसी बँकेत पीक विम्याची रक्कम काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप करत शेतकरी संतप्त झाले होते. बँक अधिकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत गेले

संदीप नागरे

हिंगोली : पीक विम्याची रक्कम बँक खात्यात जमा झाली आहे. यामुळे बँकेत रक्कम काढण्यासाठी शेतकरी येत आहेत. अशातच हिंगोलीच्या पीडीसीसी बँकेत पिक विम्याची रक्कम काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी बँकेत राडा केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हिंगोलीच्या पीडीसीसी बँकेत पीक विम्याची रक्कम काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना बँक अधिकारी दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप करत शेतकरी संतप्त झाले होते. यावरून बँक अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद झाल्यानंतर प्रकरण हाणामारी पर्यंत गेले होते. यामुळे बँकेत प्रचंड राडा झाला शेतकऱ्यांनी राडा केला होता. या प्रकरणी बँक अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय रघुजी वाघमारे व चांदू रघुजी वाघमारे अशी दोन सख्ख्या भाऊ असलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. 

शेतकरीही जाणार पोलिसात 

दरम्यान बँकेत झालेल्या राड्याप्रकरणी शेतकऱ्यांवर बँक अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला आहे. तर आता बँकेच्या व्यवस्थापकांनी शाखेच्या बाहेर येऊन कर्मचाऱ्यांना सोबत घेत शेतकऱ्यांना देखील बेदम मारहाण केल्याने आता शेतकरी देखील बँक व्यवस्थापनाच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार आहेत. यामुळे सदरचे प्रकरण तापणार असल्याचे चित्र आहे.

पिक विमा रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी
हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याचे पैसे जमा झाले आहेत. हे पैसे काढण्यासाठी शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गर्दी करत आहेत. दरम्यान मध्यवर्ती बँकेत अपुरे मनुष्यबळ असल्याने शेतकऱ्यांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं आहे. त्यात बँकेचे शिपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरील पीक विम्याची रक्कम काढून देण्यासाठी शंभर ते दोनशे रुपये अतिरिक्त घेत रांगेत नसलेल्या शेतकऱ्यांना बँकेत प्रवेश देत असल्याने बँकांमध्ये वाद सुरू आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT