Bus Fire Saam tv
महाराष्ट्र

Bus Fire : प्रवाशांनी भरलेल्या बसला आग; जीव वाचविण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, पुढे घडले ते भयंकर

Hingoli News : हिंगोली- नांदेड महामार्गावर हिंगोलीच्या औंढा शहराजवळ असलेल्या वगरवाडी जवळ लक्झरी बसने अचानक पेट घेतला. बसमधून धूर निघू लागल्याने चालकाने लागलीच बस रस्त्याच्या बाजूला घेत थांबविली

संदीप नागरे

हिंगोली : प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याची घटना हिंगोली- नांदेड राज्य महामार्गावर दुपारच्या सुमारास घडली. बसला आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवाशांनी प्रचंड आरोड्या आणि किंचाळ्या मारत जीव वाचविण्यासाठी बसमधून खाली उड्या मारल्या. मात्र घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.  

उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारच्या सुमारास उष्णता वाढत आहे. यामुळे धावत्या वाहनांना अचानक आग लागल्याच्या घटना घडत आहेत. अशातच हिंगोली जिल्ह्यात देखील कर्नाटक येथून नेपाळकडे जाणाऱ्या लक्झरी बसला तापमानामुळे आग लागली आहे. हिंगोली- नांदेड महामार्गावर हिंगोलीच्या औंढा शहराजवळ असलेल्या वगरवाडी जवळ लक्झरी बसने अचानक पेट घेतला. बसमधून धूर निघू लागल्याने चालकाने लागलीच बस रस्त्याच्या बाजूला घेत थांबविली. 

जीव वाचविण्यासाठी प्रवाशांच्या उड्या 

दरम्यान बसला आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवाशांनी आरोड्या मारण्यास सुरवात केली. जीव वाचविण्यासाठी बसमधून उड्या मारल्या. यामुळे या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांनी उड्या मारून आपले प्राण वाचवल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र घटनेमुळे बसमधील प्रवाशी प्रचंड घाबरले होते. प्रवासी खाली उतरताच संपूर्ण बसला आग लागून बस जळून खाक झाली आहे. चालकाच्या सतर्कतेने ५० प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. 

महामार्गावरील वाहतूक खोळंबली 

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच औंढा नगरपंचायत प्रशासनाने अग्निशमन पथकाला घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र संपूर्ण लक्झरी बस आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने आगीचा मोठा भडका उडून बसचा केवळ सांगाडा उरला आहे. दरम्यान घटनेमुळे या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT