Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : वेल्डिंग काम करताना घडले भयंकर; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर

Hingoli News : हिंगोलीच्या औंढा शहरातील बस स्थानकाच्या पुढे एका दुकानाचे काम करत असताना हि घटना घडली आहे. चारजण मिळून दुकानात वेल्डिंगचे काम करत होते

संदीप नागरे

हिंगोली : दुकानात वेल्डिंगचे करण्याचे काम सुरू होते. हे काम करत असताना चार कामगारांना विजेचा जोरदार झटका बसला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना औंढा शहरात घडली आहे. 

हिंगोलीच्या (Hingoli) औंढा शहरातील बस स्थानकाच्या पुढे एका दुकानाचे काम करत असताना हि घटना घडली आहे. चार जण मिळून दुकानात वेल्डिंगचे काम करत होते. हे काम करत असताना जवळच विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेला कामगारांना स्पर्श झाला. यावेळी लोखंडाशी संपर्क असल्याने चारही जणांना जोरदार झटका (electric Shock) बसला आणि हे कामगार जमिनीवर कोसळले. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल केले. 

नातेवाईकांचा आक्रोश 

रुग्णालयात दाखल केल्यानंतर एका कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे शेख सरफराज असं नाव आहे. तर तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर नातेवाईकांनी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. कामगाराचा मृत्यू झाल्याची बातमी नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी टाहो फोडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT