Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : पतीच्या मृत्यूची बातमी ऐकताच वृद्ध पत्नीनेही सोडले प्राण; दोघांवर सोबतच अंत्यसंस्कार

Hingoli News : घरी अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या या पती-पत्नीने आपल्या संसारीक जीवनात नेहमी एकमेकांना साथ देत संसाराचा गाडा यशस्वीपणे ओढला

संदीप नागरे

हिंगोली : संपूर्ण जीवन सोबत घालवल्यानंतर पती- पत्नीची सोबतच अंत्ययात्रा काढण्यात आली. वयोवृद्ध असलेल्या पतीच्या निधनानंतर काही तासातच पत्नीनेही आपले प्राण सोडल्याची हृदय विदारक घटना हिंगोलीच्या बासंबा गावामध्ये घडली आहे, नामदेव रामनाथ पवार तर समिंद्राबाई नामदेव पवार असे मयत पती- पत्नीची नाव आहे. दरम्यान गावकऱ्यांनी दोघांचेही अंत्यसंस्कार एकाच वेळी करत दोघांनाही श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

नामदेव पवार व समिंदराबाई पवार हे वृद्ध दाम्पत्य बासंबा गावामध्ये वास्तव्यास होते. यात पतीचे वय ८५ वर्ष तर पत्नीचे वय ८० वर्ष असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. दोघांचेही वय झाल्याने वृद्धापकाळमुळे दोघांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. घरी अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या या पती-पत्नीने आपल्या संसारीक जीवनात नेहमी एकमेकांना साथ देत संसाराचा गाडा यशस्वीपणे ओढला. या पती-पत्नीला दोन मुले एक मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे.  

अंत्ययात्रा सोबतच 

दरम्यान आजारपणामुळे नामदेव पवार यांचा मृत्यू झाला. याची माहिती पत्नी समिंदराबाई यांना समजली. यामुळे जीव कासावीस होऊन पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासातच पत्नीने देखील प्राण सोडले. आयुष्यभर साथ देणाऱ्या या पती- पत्नीची अंत्ययात्रा देखील सोबतच काढण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण बासंबा गावासह परिसरावर शोककळा पसरली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Special Offer: सासू सुनेचा राडा ते सस्पेन्स ड्रामा; १ रुपयात ३० फुलऑन दिवस मनोरंजन

Paneer Recipe : पनीर बिर्याणी अन् मटर पनीर खाऊन कंटाळलात? मग 'ही' चटपटीत रेसिपी एकदा ट्राय कराच

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत शिंदे गटाला मोठा धक्का; कोकणातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

November Travel: नोव्हेंबरमध्ये पिकनिक प्लॅन करताय? मग 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT