Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarkshan : मराठा आंदोलकांनी महामंडळाची बस पेटवली; हिंगोली- नांदेड मार्गावरील घटना

Hingoli News : मराठा आंदोलकांकडून ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन केले जात आहे. या दरम्यान हिंगोलीच्या वसमतमध्ये सुरू असलेल्या रास्ता रोको

साम टिव्ही ब्युरो

हिंगोली : मराठा आंदोलकांकडून ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन केले जात आहे. या दरम्यान हिंगोलीच्या (Hingoli) वसमतमध्ये सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान महामंडळाची बस (St Bus) पेटवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर अग्निशमन दलाने आग विझविली. यात बसचे नुकसान झाले आहे.  (Latest Marathi News)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) राज्यभरात आंदोलन सुरु आहे. हिंगोलीत देखील मराठा आंदोलक आक्रमक झाले असून हिंगोली ते नांदेड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान खांडेगाव पाटीजवळ अज्ञात आंदोलकांनी ही बस पेटवली असून यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. मात्र बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाच्या मदतीने पेटवण्यात आलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यात बसचे मोठे नुकसान झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेडमध्ये लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द
नांदेड
: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषन सुरु आहे. त्यांची तब्येत खालावल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून (Nanded) नांदेड एसटी महामंडळाने लांब पल्याच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. नागपूर, अकोला, यवतमाळ, संभाजीनगर आदी मार्गावरील जवळपास दोनशे बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. हदगावला जाणारे बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान एसटी बसेस बंद करण्यात आल्याने प्रवाश्याची तारांबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT