Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, एका वक्तव्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढणार?

Manoj Jarange Patil : येत्या 14 तारखेला जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजातील प्रत्येकाने उपस्थित राहण्याचा आव्हान देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

Hingoli News :

मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा अडचण सापडण्याची शक्यता आहे. कारण आता मराठा समाजाकडे कोणतेही पुरावे नसले तरी आरक्षण हवंय आणि ते द्यावेच लागेल, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

हिंगोलीमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलन स्थळी भेट देण्यासाठी जरांगे पाटील आले होते. यावेळी येत्या 14 तारखेला जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजातील प्रत्येकाने उपस्थित राहण्याचा आव्हान देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. (Latest Politics News)

मराठा समाजाला सरसकट ओबीसी दाखले देणार नसल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांच्या बैठकीत दिला असल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी केला होता. मात्र आता ओबीसी नेत्यांचा हा दावा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा लढा उभा करणाऱ्या जरांगे पाटलांनी खोडून काढला आहे.

जरांगे पाटलांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे. दरम्यान ओबीसी नेत्यांची भूमिका ही सरकारची भूमिका नाही, सरकारने समिती स्थापन केली आहे. आमच्याकडे वेळ मागितला आहे, त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच आरक्षण मिळेपर्यंत सरकारला सुट्टी नाही, असंही ते म्हणाले.  (Latest News)

एकीकडे मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई लढतोय. तर दुसरीकडे कुणबी मराठा हा ओबीसी समाजाबरोबर मराठ्यांना आरक्षण देऊ नये यासाठी आंदोलन करत आहे. या विरोधात आता मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या जरांगे पाटलांनी कठोर भूमिका घेतली आहे.

ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मराठा समाजाने बळ देऊ नये असं आवाहन त्यांनी केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर ज्यांना प्रमाणपत्र काढायचं त्यांनी काढा, ज्यांना काढायचं नाही त्यांनी काढू नका, मात्र छगन भुजबळ यांना ताकद देऊ नका, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT