CM Eknath Shinde: मी केलेल्या क्रांतीमध्ये मराठवाड्याने मोठी साथ दिली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam Tv
Published On

CM Eknath Shinde:

ठाण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदाराच्या मदतीनं केलेल्या बंडाची आठवण परत एकदा केली. माझ्या क्रांतीमध्ये मराठवाड्यानं मोठी मदत केली. माझ्यासोबत पाच आमदार होते, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेतील बंडाची आठवण काढली. मुख्यमंत्री मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.(Latest Politics News)

यावेळी त्यांनी मराठवाडा आणि तेथील जनतेचं कौतुक केलं. या कार्यक्रमात मराठवाडा भूषण आणि मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि अखिल भारतीय वारकरी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना मराठवाडा भूषण प्रदान करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना चिमटे काढले. शिंदेंनी केलेल्या बंडाची आठवण काढली. मुख्यमंत्री म्हणाले की, बंड केल्यानंतर मोठ्या लोकांनी माझं कौतुक केले. 'माझ्या निर्णयानंतर मला खूप मोठ्या लोकांना फोन करून अभिनंदन केलं. खूप चांगला आपण निर्णय घेतला म्हणून मला फोन केला. महाविकास आघाडी सरकारनं औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामकरण केलं. त्याची आठवण करत मुख्यमंत्री शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.

महाविकास आघाडीच्या काळात नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे गुवाहटीमध्ये होते. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, आम्ही गुवाहटीमध्ये असताना येथे कॅबिनेट घेतली. कारभार चालू असताना कॅबिनेट घेऊ शकले नाही, मग कस नामांतर होणार. नंतर आमचं सरकार आलं आम्ही नामांतर केलं.

कारण आम्ही ठोक काम करतो म्हणून अधिकृत आता नामांतर झालं, असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आमचे सरकार आल्यानंतर एकही मिटिंग न घेता कोविड पळवून लावला. फक्त मी फिल्डवर उतरून काम करत होतो. काही जणांना घरात बसायची आवड असते. म्हणून आम्ही लॉकडाऊन रद्द केला असल्याची टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी मराठवाड्यात राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. समृद्धी हायवे सोलापूरला जोडला जातोय. नागपूर ते गोवा ५ शक्तिपीठे येताहेत. ठाण्यात मराठवाडा भवनसाठी भूखंड देणार आहे. मराठवाड्यातून मागास शब्द काढायचा म्हणून आपण ६० हजार कोटी रुपये दिलेत, असंही ते म्हणाले. मराठवाड्यातील माणूस कुठे नोकरीसाठी गेला तरी मराठवाडा लढ्याचा विसर त्यांना होत नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांची मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या मुळेच तीन संस्थानं भारतात सामील झाली, असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com