Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : वंचितच्या उमेदवारांवर अज्ञातांकडून हल्ला; गाडीवर केली दगडफेक

Hingoli News : विधानसभा निवडणुकीचे मतदार उद्या (२० नोव्हेंबर) होत आहे. दरम्यान निवडणुकीसाठी मागील दहा- पंधरा दिवसांपासून सुरु असलेला प्रचार आता संपला असून आज उमेदवार गाठीभेटींवर भर देत आहेत

Rajesh Sonwane

हिंगोली : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार तोफा थंडावल्या आहेत. मात्र निवडणुकीत चुरस अधिक आहे. यात हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. गाडीवर देखील दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  

विधानसभा निवडणुकीचे मतदार उद्या (२० नोव्हेंबर) होत आहे. दरम्यान निवडणुकीसाठी मागील दहा- पंधरा दिवसांपासून सुरु असलेला प्रचार आता संपला असून आज उमेदवार गाठीभेटींवर भर देत आहेत. दरम्यान सोमवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी प्रचार थांबला असून रात्री उशिरापर्यंत काही उमेदवार हे घरी जात होते. याच दरम्यान (Vanchit Bahujan Aaghadi) वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर हल्ला झाल्याचा प्रकार हिंगोलीत (Hingoli News) समोर आला आहे. 

उमेदवार झाले जखमी 

हिंगोली कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावरील सेल्सुरा फाटा येथे ही घटना घडली असून या घटनेत उमेदवार दिलीप मस्के हे जखमी झाले आहेत. दरम्यान मस्के यांना तातडीने हिंगोलीच्या खाजगी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले असून या घटनेचा वंचित बहुजन आघाडीने निषेध केला आहे. हल्ला करणाऱ्या आरोपी विरोधात तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी देखील वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hitendra Thakur : बॅग, डायरी आणि १००,००० रुपयांची रोकड; हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं नेमकं काय घडलं? वाचा

Swapna Shastra: स्वप्नामुळे बदलतं नशीब, 'या' गोष्टी दिसल्या तर चमकेल तुमचं भाग्य

विनोद तावडेंची माहिती भाजपच्याच नेत्यानं दिली, आम्हाला काय स्वप्न पडलं? हितेंद्र ठाकूरांचा दावा

Sangli News : विना नंबरची गाडी पकडण्यावरून गोंधळ; पडळकरांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप

Vinod Tawde: विनोद तावडेंची माहिती भाजपच्या प्रमुख नेत्यानेच दिली, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT