HIngoli News Saam tv
महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aghadi : वंचितच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म; हिंगोलीत विचित्र प्रकाराने पेच

Hingoli News : दोन्ही उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीकडून आपणच उमेदवार आहोत; असा दावा केला आहे.

संदीप नागरे

हिंगोली : विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली जात आहे. मात्र हिंगोलीमध्ये विचित्र प्रकार समोर आला आहे. वंचितच्या दोन उमेदवारांना प्रकाश आंबेडकरांनी एबी फॉर्म दिले आहेत. यामुळे आता दोघेही उमेदवारी मिळाल्याचा दावा करत आहे. 

हिंगोलीत (Hingoli) वंचित बहुजन आघाडीने दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने गोंधळ उडाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सुरवातीला जावेदराज यांना हिंगोली विधानसभेतून उमेदवारी दिली होती. त्या नंतर अचानक आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते आणि नव्याने वंचित बहुजन आघाडीमध्ये (Vanchit Bahujan Aghadi) प्रवेश केलेल्या प्रकाश थोरात यांना उमेदवारी जाहीर करत एबी फॉर्म दिला आहे. यामुळे दोघंही उमेदवारांनी अर्ज दाखल करत उमेदवारीवर दावा केला आहे. 

निवडणूक निर्णय अधिकारी घेणार निर्णय 

दरम्यान या प्रकाराने दोन्ही उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीकडून आपणच उमेदवार आहोत; असा दावा केला आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय राखून ठेवला असून राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेऊन हिंगोलीचे निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय देणार आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World : जगातील 'या' देशात १२ नाही तर आहेत चक्क 13 महिने

VIDEO : राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? मोठी अपडेट आली समोर

Maharashtra Exit Poll : धुळेकरांचा कौल ठाकरेंना, एक्झिट पोलच्या अंदाजात काय सांगितले?

Parvati Exit Poll: पर्वतीमधून भाजपच्या माधुरी मिसाळ होणार आमदार? पाहा EXIT POLL

Aurangabad Central Exit Poll: औरंगाबाद मध्य मतदारसंघात कोण विजयी होणार? संभाव्य आमदाराचं नाव आलं समोर

SCROLL FOR NEXT