Hingoli fire today Saam TV
महाराष्ट्र

Hingoli Fire : अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग; ३ जणांचा मृत्यू, दुचाकी चालकाचा कोळसा, ११ जखमी

Hingoli fire today : हिंगोली शहरातील रहिवासी भागात अनधिकृत फटाक्यांच्या साठ्याला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी झाले असून ५ घरे आणि अनेक वाहने जळून खाक झाली.

Namdeo Kumbhar

संदीप नागरे, हिंगोली प्रतिनिधी

हिंगोली शहराच्या मध्यवर्ती व वर्दळीच्या भागातील रहिवासी वस्तीत अनधिकृतरीत्या साठवून ठेवलेल्या फटाक्यांच्या साठ्याला भीषण आग लागल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या 'अग्नितांडवात' आतापर्यंत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ११ हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. गोपाल बासटवार यांच्या घरात फटाक्यांची कोणतीही परवानगी न घेता अवैध साठवणूक करण्यात आली होती, जिथे फटाक्यांची जमवाजमव सुरू असताना अचानक आग भडकली.

दुचाकी चालकाचा जागीच होरपळून मृत्यू

या घटनेत अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, रोजच्याप्रमाणे आपले काम आटोपून घराकडे परतणारा एक निष्पाप दुचाकी चालक या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आग भडकली त्याच वेळी सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या या दुचाकी चालकाचा दुचाकीवरच होरपळून अक्षरशः कोळसा झाला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तो पूर्णपणे जळाल्याने त्याची ओळख पटू शकलेली नाही. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, डीएनए (DNA) चाचणीनंतरच त्याची ओळख पटवून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला जाईल.

५ घरे जळून खाक; पालिका कर्मचाऱ्यांसह ११ जण जखमी

हिंगोलीचे पोलीस उपाधीक्षक, पोलीस दल, महसूल पथक आणि हिंगोली पालिकेच्या अग्निशमन दलाने तब्बल साडेतीन तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आगीचा भडका इतका भीषण होता की, परिसरातील ५ घरे आणि अनेक वाहने जळून खाक झाली. मदतीसाठी धावलेले हिंगोली पालिकेचे ३ कर्मचारीही या आगीत गंभीररीत्या भाजले आहेत. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'साम टीव्ही'चा धडक खुलासा; मध्यरात्री फटाके पळवण्याचा प्रयत्न

या घटनेनंतर 'साम टीव्ही'ने परिसराचे वृत्तांकन केले असता, शहराच्या मध्यवर्ती भागात सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता अवैध फटाके साठवल्याचे उघड झाले. आग लागल्यानंतरही काही बेजबाबदार व्यापाऱ्यांनी सुरक्षेची काळजी न घेता गुपचूप गोडाऊनमधून फटाके पळवण्याचा प्रयत्न केला, जे दृश्य 'साम टीव्ही'च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याचा आरोप आता केला जात आहे.

नांदेडकर कुटुंब आगीच्या तावडीतून बालंबाल बचावले

दरम्यान, या भीषण आगीच्या तावडीतून शैलेश नांदेडकर आणि त्यांचे कुटुंब आश्चर्यकारक रीतीने सुरक्षित बाहेर पडले. डोळ्यांदेखत घर आणि परिसर जळताना पाहून त्यांनी आपली आपबीती सांगताना ईश्वराचे आभार मानले.

या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत आता जिल्हा प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितृपक्षात आवर्जून बनवा भोपळ्याची भाजी, कांदा-लसूणशिवायही लागेल एकदम चविष्ट

Bribe Case : पोलीस अधिकाऱ्याने ₹१३०००० घेतले, पण अचानक ACB चं पथक धडकले, लाचखोर PSI कसा अडकला जाळ्यात

Car Engine Oil: किती किलोमीटर्सनंतर कारचं इंजिन ऑईल बदललं पाहिजे?

Maharashtra News Live Update: पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपती मंदिरात चोरट्यांचा डल्ला

Sleep Problems : सावधान! रात्री अचानक जाग येतेय? या आजाराची असू शकतात लक्षणं

SCROLL FOR NEXT