Hingoli Crime saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime: मोक्काचा आरोपी-पोलिसांत झटापट, गोळीबारानंतर जे घडलं ते भयंकर....

Hingoli Crime: पोलिसांना गेल्या अनेक दिवसांपासून हवा असलेला मोक्काचा आरोपी कळमनुरी शहरात आल्याची माहिती मिळाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hingoli Crime: हिंगोलीच्या कळमनुरी शहरात मोक्का प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत पोलीस उपनिरीक्षक शेख माजित हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांविरुद्ध कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. आज सकाळी पोलिसांना गेल्या अनेक दिवसांपासून असलेला मोक्काचा आरोपी कळमनुरी शहरातील झोपडपट्टी परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे हे इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आरोपीच्या अटकेसाठी रवाना झाले. (Latest Marathi News)

मात्र पोलीस आल्याचे पाहताच आरोपीने धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत पोलीस उपनिरीक्षकाला अचानक छातीमध्ये गोळी लागली. मात्र ही गोळी कुणाच्या बंदुकीतून बाहेर पडली याबाबत अद्याप पोलिसांनी स्पष्ट केले नाही. (Hingoli crime)

या घटनेनंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान जखमी पोलीस अधिकारी माजित यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे, तसेच पोलिसांनी संबंधित आरोपीला देखील ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

भोंदू खरातचा पाय आणखी खोलात, SIT पाठोपाठ आयकरच्याही रडारवर?

SCROLL FOR NEXT