Manasvi Choudhary
कांद्याचा उपयोग जेवणासाठीच नाही तर केसांसाठीही फायदेशीर आहे. कांद्याचा रस केसांच्या समस्यांसाठी गुणकारी मानला जातो.
बाजारातील केमिकलयुक्त नाही तर घरच्या घरी तुम्ही केसांसाठी कांद्याचा रस तयार करू शकता.
कांद्याचा तेल बनवण्यासाठी कांदे, खोबरेल तेल, कढीपत्ता आणि मेथी दाणे हे साहित्य एकत्र करा.
कांद्याचे तेल बनवण्यासाठी सर्वात आधी कांदे सोलून त्याचे बारीक तुकडे करा. नंतर हे बारीक केलेले तुकडे मिक्सरमध्ये पेस्ट करा.
गॅसवर कढईमध्ये खोबरेल तेलामध्ये कांद्याची पेस्ट आणि कढीपत्ता टाका. कढईमध्ये तयार केलेली पेस्ट सतत ढवळत राहा यामुळे पेस्ट तळाला लागणार नाही.
जेव्हा कांद्याच्या पेस्टचा रंग हलका तपकिरी होईल तेलातून फेस येणे बंद होईल, तेव्हा समजावे की तेल तयार झाले आहे.
गॅस बंद करा आणि तेल पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर एका सुती कापडाने किंवा गाळणीने तेल गाळून घ्या.
तयार झालेलं कांद्याचे तेल हे तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये ठेवू शकता म्हणजे २ ते ३ महिने व्यवस्थित राहील.