Hingoli Crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime : चोरट्यांचा चोरीचा नवा फंडा; पोलीस असल्याची बतावणी करत दागिने लांबविले

Hingoli News : वसमत तालुक्यातील जवळा बाजार परिसरात नारायण शेळके या शेतकऱ्याच्या हातातील अंगठी चोरट्यांनी पळवल्याचे प्रकरण घडले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल

संदीप नागरे

हिंगोली : चोरी करण्यासाठी चोरटे वेगवेगळी शक्कल लढवत असतात. रात्री दरोडा टाकण्यासोबत दिवसा घरोघरी जाऊन वेगवेगळे कारणांनी घरात घुसून चोरी करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांनी चोरी करण्याचा नवा फंडा सुरू केला आहे. एखाद्या व्यक्तीला गाठत पोलीस असल्याची बतावणी हे चोरटे करतात. यानंतर संधी मिळताच दागिने घेऊन पसार होत असल्याचे प्रकार घडले आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात चोरी करणारी हि टोळी सक्रिय झाली होती. मागील काही दिवसात हे दागिने लांबविण्याचे प्रमाण वाढले होते. यात अंगावर दागिने असलेल्या व्यक्तींना गाठत आम्ही पोलिस आहोत. दागिने घालून कशाला फिरता; असे म्हणत दागिने काढायला लावून हात चालाखी करून दागिने लंपास करण्यात येत असल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या आठ दिवसात चार ठिकाणी महिला व पुरुष नागरिकांना अशाप्रकारे लुटण्यात आल्याचे पुढे आले आहे.  

पोलिसात गुन्हा दाखल 

हिंगोली शहरातील बासंबा कॉर्नर, खटकाळी बायपाससह लिंबाळा एमआयडीसी परिसरात प्रत्येकी एक घटना घडली आहे. तर वसमत तालुक्यातील जवळा बाजार परिसरात नारायण शेळके या शेतकऱ्याच्या हातातील अंगठी चोरट्यांनी पळवल्याचे प्रकरण घडले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल झाले असून हिंगोली पोलिसांनसमोर या चोरट्यांनी आवाहन उभे केले आहे.

चोरीतील एक लाखांची रक्कम महिलेला मिळाली परत
यवतमाळ
: यवतमाळच्या घाटंजी शहरा शहराजवळील स्टेट बँक जवळ पंधरा दिवसांपूर्वी भर दिवसा चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरी प्रकरणी घाटंजी पोलिसांनी तात्काळ तपास करून अवघ्या काही दिवसात गुन्हा उघडकीस आणला. विशेष म्हणजे चोरी गेलेली संपूर्ण एक लाख रुपयाची रक्कम अप्पर पोलीस अधीक्षक आणि ठाणेदार केशव ठाकरे यांच्या हस्ते फिर्यादी महिलेला अधिकृतरित्या परत करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muktagiri Waterfall: विकेंडचा प्लान बनला नसेल तर अमरावतीच्या 'या' धबधब्यावर भिजायला जा!

Shocking News: वेड्यासारखं प्रेम... रुग्ण तरुणीचा मृत्यू; पुरलेला मृतदेह घरी आणून ७ वर्षे सोबत राहिला डॉक्टर

Kamali: कमळी मालिकेत नवा ट्विस्ट; थिएटरमध्ये कमळीची छेड काढल्यामुळे ऋषीचा संताप अनावर, दोघांच्या नात्याला मिळणार नये वळण

Voter List Scam: महाराष्ट्र, कर्नाटकानंतर केरळातही घोळ; एकाच पत्त्यावर ९ जणांची बनावट मतदार नोंदणी

Maharashtra Live News Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सरीना सुरूवात

SCROLL FOR NEXT