Hingoli: 'लस नाहीतर राशन नाही'; जिल्हाधिकाऱ्यांची नामी शक्कल  Saam TV
महाराष्ट्र

Hingoli: 'लस नाहीतर राशन नाही'; जिल्हाधिकाऱ्यांची नामी शक्कल

राज्यात तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) शक्यता सर्वच तज्ज्ञांनी वर्तविली आहे, या संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी, केंद्र व राज्य शासन, कसोशीने प्रयत्न करत आहे.

साम टिव्ही ब्युरो

हिंगोली: राज्यात तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) शक्यता सर्वच तज्ज्ञांनी वर्तविली आहे, या संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी, केंद्र व राज्य शासन, कसोशीने प्रयत्न करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या निर्देशानुसार देशातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण (Vaccination) करणे गरजेचे असल्याने, आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणा , गावोगावी जाऊन शिबिरद्वारे नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवत आहे. मात्र असे असले तरी, अनेक गावात प्रशासनाच्या लसीकरण मोहिमेकडे नागरिक कानाडोळा करत लसीकरण करून घेत नसल्याची बाब पुढे आली आहे.

त्यामुळे संपूर्ण राज्यात हिंगोली जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी कमी झाली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने यावर नामी शक्कल लढवत लसीकरणाचा वेग वाढवला आहे. हिंगोली चे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी, मागील आठ दिवसापूर्वी, जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणांची बैठक घेत, यापुढे लसीकरण नाही तर सातबारा नाही लसीकरण नाहीतर राशन ही नाही अशी तंबी देत, नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले, जिल्हाधिकाऱ्यांच्या या इशाऱ्यानंतर, मागील चार दिवसात हिंगोली जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक लसीकरण झाले आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या या अनोख्या युक्तीने जिल्ह्यात नागरिक लसीकरणाला कसा प्रतिसाद देत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT