Hingoli Bus Accident Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli Bus Accident: हिंगोलीत बस-ट्रकची समोरासमोर धडक, 20 वीस प्रवासी जखमी

हिंगोलीत बस-ट्रकची समोरासमोर धडक, 20 वीस प्रवासी जखमी

साम टिव्ही ब्युरो

Hingoli Bus Accident: हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वगरवाडी गावाजवळ बस व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस मधील प्रवासी जखमी झाले आहेत. तर वाहकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच रस्त्याने जाणारे खासदार हेमंत पाटील यांनी बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघाताच्या घटनेनंतर दोन्ही वाहने रस्त्यावर असल्याने या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. पोलिसांनी आता ही वाहने हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू केली आहे.

खामगाव-पंढरपूर महामार्गावर जीप अन् दुचाकीचा भीषण अपघात

दरम्यान, आज खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या बीडच्या केज शहरालगत एका जीप आणि दुचाकीचा भीषण अपघातही झाला आहे. (Latest Marathi News)

या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. (Accident News)

ही घटना केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या समोर घडली आहे. रामेश्वर घोडके रा. टाकळी ता. धारूर असं मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर गंभीर जखमी असलेल्या एकावर केज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT