Hingoli Accident News Saam TV
महाराष्ट्र

Hingoli Accident News: जलजीवन मिशनसाठी खोदला खड्डा, हसत्या खेळत्या २ चिमुकल्यांचा मृत्यू; आई-वडिलांनी फोडला टाहो

सोहम लिंबोळे आणि आरोशी यातळकर अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

Hingoli News: हिंगोलीत केंद्र शासनाच्या वतीने सुरू असलेली जलजीवन मिशन योजना दोन चिमुकल्यांच्या जीवावर बेतली आहे. हिंगोलीच्या वटकळी आणि सावा गावात जल कुंभासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोहम लिंबोळे आणि आरोशी यातळकर अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. (Latest Marathi News)

दोन्ही चिमुकले सात ते आठ वर्षांचे होते. दोघेही खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. खेळता खेळता परिसरात जलजीवन मिशन योजनेसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात त्याचा तोल गेला. या दोघांनाही वाचवण्याते शर्थिचे प्रयत्न करण्यात आले. मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले. दोघांचाही या घटनेत मृत्यू झालाय.

या घटनेनंतर आता पोलीस प्रशासनाने संबंधित कंत्राटधाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात ६००० पेक्षा अधिक गावांमध्ये या योजनेचे काम सुरू आहे. अशात प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक गावातील योजनेची कामे रखडल्याने मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. या खड्ड्यांमध्ये देखील अशा दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आपली हसती खेळती मुलं घराबाहेर खेळत असताना असं काही घडेल याची त्यांच्या आई बाबांना काहीच कल्पना नव्हती. चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांनी रडून आक्रोश व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹३००० नाही तर ₹१५०० च येणार, तारीखही आली समोर; सरकारने घेतला मोठा निर्णय

MLC Election: नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा उलटफेर; भाजपचे टेन्शन वाढलं, लीड घटली

Rock Salt Vs Sea Salt: सैंधव मीठ, समुद्री मीठ की इतर कोणते मीठ? रोजच्या जेवणासाठी कोणते मीठ वापरावे?

Pratap Asbe Death News: राजकारणाचा सखोल अभ्यासक हरपला! ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन

Matheran Train : घाटमार्ग पुन्हा गजबजणार! माथेरानची राणी शुक्रवारपासून पुन्हा धावणार, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

SCROLL FOR NEXT