hindutvawadi sanghatana calls akkalkot bandh today  saam tv
महाराष्ट्र

Akkalkot Bandh : अक्कलकोट बंद, अफवांना बळी पडू नका : पाेलिसांचे आवाहन

युवकाला न्याय मिळावा यासाठी आज अक्कलकाेटचे नागरिक जिल्हा प्रशासन आणि पाेलिस ठाण्यात निवेदन देणार आहेत. दरम्यान अक्कलकाेट पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

विश्वभूषण लिमये

Akkalkot News :

धार्मिक भावना दुखवल्याने आज (गुरुवार) स्थानिक नागरिकांनी अक्कलकोट शहर बंदची (akkalkot band) हाक दिली. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर साेलापूर जिल्हा पाेलिस दलाने अक्कलकाेट शहरात चाेख बंदाेबस्त ठेवला आहे. (Maharashtra News)

स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार एका युवकाने धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत एकास जाब विचारला. त्यामुळे जाब विचारणा-याने युवकास मारहाण केली. याचे पडसाद अक्कलकाेट शहरात उमटले. युवकास मारहाण का केली गेली याचा जाब विचारण्यासाठी आणि न्याय मिळावा यासाठी पाेलिस ठाण्यात निवेदन देण्याचे नागरिकांनी निर्णय घेतला.

या मारहाणीचा निषेध म्हणून आज अक्कलकोट शहर बंदची हाक देण्यात आली. अक्कलकोट बंदला समिश्र प्रतिसाद लाभला आहे. शहरात पोलिसांचा तगडा बंदोबसत आहे. युवकाला मारहाण करणा-यास पोलिसांनी शाेधून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यास अटक करावी अशी मागणी आज नागरिक प्रशासनास निवेदन देऊन करणार आहेत. दरम्यान नागरिकांनी काेणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अल्पवयीन मुलीला फ्लाईंग किस देणं पडलं महागात, तरुणाला भोगावा लागणार ३ वर्षाचा तुरुंगवास

Maharashtra Live News Update: अमोल कोल्हे यांचा गौप्य स्फोट

AI इम्पॅक्ट समिटमध्ये PM मोदींविरोधात घोषणा, युवा काँग्रेसच्या आंदोलनामागचं कारण काय?

Spinach Paneer Toast Recipe: पिझ्झा-बर्गर विसरून जाल! मुलांसाठी बनवा सुपर हेल्दी क्रिस्पी पालक पनीर टोस्ट; रेसिपी आहे एकदम सोपी

Tata Punch EV Price: 15 मिनिटांत चार्ज होणारी टाटा पंच इलेक्ट्रिक भारतात लॉन्च; परवडणारी किंमत, 468 KM रेंज अन् बरंच काही, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT