कोल्हापूर : कोल्हापूरातील (Kolhapur) हिंदुत्व टिकवायला पाहिजे, ही जागा शिवसेनेची होती पण आता ही जागा काँग्रेसकडे जाता कामा नये. काँग्रेसकडे गेलेला मतदार पुन्हा येणं शक्य नाही. बंटी पाटील यांची सवय सगळ्यांना माहीत आहे असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील (Kolhapur North Assembly By-Election) प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेचत. याच पार्श्वभूमिवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मतदारांशी ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला असता त्त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरे हे एकटेच हिंदुह्रदयसम्राट आहेत, भाजपने नकली हिंदुह्रदयसम्राट तयार करण्याचा प्रयत्न केला मात्र जनतेने त्या नकली हिंदुह्रदयसम्राटला नाकारलं.' असं म्हणत मुख्यमत्र्यांनी भाजपवर टीका केली.
त्यांच्या भाषणातील हाच धागा पकडत चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या पत्रकारपरिषदेत ठाकरेंना प्रत्तुत्तर दिलं. पाटील म्हणाले, 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज कोल्हापूर उत्तर निवडणुकीसाठी व्हर्च्युअल भाषण केलं. या भाषणात शिवसैनिकांना त्याग करण्याचं आवाहन केलं, म्हणजे माझ्या खुर्चीसाठी तुम्ही त्याग करा असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.
तसंच कोल्हापुरातील हिंदुत्व टिकवायला पाहिजे, ही जागा शिवसेनेची होती पण आता ही जागा काँग्रेसकडे जाता कामा नये. काँग्रेसकडे गेलेला मतदार पुन्हा येणं शक्य नाही. बंटी पाटील यांची सवय सगळ्यांना माहीत आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे समजने वालों की इशारा काफी है. त्यांनी कोल्हापुरातील हिंदुत्व पुसणार नाही, असं त्यांनी म्हटलं म्हणजे भाजपला मत द्या;. होय असंही पाटील म्हणाले.
तसंच आम्हाला शिवसेनेचा पुळका नाही तर हिंदुत्वाचा पुळका आहे. हिंदुहृदयसम्राट एकच आहे आणि ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे दुसरे बाळासाहेब ठाकरे होणार नाहीत, कुणी प्रयत्न देखील केला नाही. भाजपच्या मदतीने जिल्ह्यात 6 आमदार आले होते त्यावेळी बर बोलला नाही. पडल्यानंतर भाजपकडे बोट दाखवता अशी टीकाही पाटलांनी केली.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.