यवतमाळमधील हिंदु-मुस्लीम बांधव एकत्र मिळून करतायत बाप्पाची आराधना संजय राठोड
महाराष्ट्र

यवतमाळमधील हिंदु-मुस्लीम बांधव एकत्र मिळून करतायत बाप्पाची आराधना

यवतमाळमधील मुस्लिम समाजातील युवक गणेशमूर्तीची स्थापना करतायत. अनेक वर्षांपासून मुस्लिम-हिंदू युवक मिळून गणेशोत्सव उत्साहात साजरा करतायत.

वृत्तसंस्था

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळ: मुस्लिम समाजातील युवक गणेशोत्सव साजरा करतात असे म्हटलं तर कोणाचाच विश्वास बसणार नाही, मात्र हो यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमध्ये मुस्लिम समाजातील युवक हिंदू समाजातील युवकांना सोबत घेऊन दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात. (Hindu-Muslim brothers in Yavatmal worship Bappa together)

हे देखील पहा -

सुरूवातीला मुस्लिम समाजातील काही युवकांनी गणेशमुर्ती बसवविण्याबाबत हिंदू समाजातील युवकांना कडे भावना बोलून दाखवली. त्यानंतर हिंदू समाजातील युवकांनी चांगली संकल्पना सुचविली असे म्हणुन होकार दिला आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला. गेल्या दहा वर्षांपासून गारपीट गणेश उत्सव मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे. या मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि ७० टक्के पदाधिकारी हे मुस्लिम समाजातील युवक आहेत. सुरूवातीला आरती वैगरे येत नव्हती, मात्र आता मुस्लिम समाजातील युवकांना आरती देखील मुकपाठ असल्याने दोन्ही वेळेच्या आरत्या तेच म्हणतात.

हिंदू आणि मुस्लिम समाजात चांगला संदेश देण्याचे काम गारपीट गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी गणेशोत्सवाच्या माध्यमातून करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan Boyfriend: सारा अली खान 'या' भाजप नेत्याच्या मुलालासोबत आहे रिलेशनशिपमध्ये?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार: विशेष मकोका न्यायालय

Narendra Modi : सैन्याच्या पराक्रमाला काँग्रेसचं समर्थन नाही हे दुर्भाग्य; PM मोदींच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक, VIDEO

हिम्मत असेल तर पंतप्रधानांनी सांगावं,राहुल गांधींचं थेट आव्हान|VIDEO

Sweet Corn Soup Recipe : पावसाळ्यात फक्त १० मिनिटांत बनवा कॉर्न सूप, चवीला सुपरटेस्टी अन् घशाला मिळेल आराम

SCROLL FOR NEXT