Santosh Bangar
Santosh Bangar Saam TV
महाराष्ट्र

Hingoli News: चॅलेन्ज अंगाशी आलं; आमदार संतोष बांगर मिशा काढणार का?, ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांची शेलक्या भाषेत टीका

साम टिव्ही ब्युरो

Hingoli News: शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ पाटील यांनी शेलक्या भाषेत टीका केली आहे. बाजार समिती निवडणुकी आधी 17 पैकी 17 जागा निवडून आणणार असल्याचा दावा संतोष बांगर यांनी केली होता. मात्र निकालानंतर चित्र वेगळच दिसत आहे. यानंतर अयोध्या पौळ यांनी 'प्रिय लाडक्या संतोष दादुड्या "मुछ" कधी काढतोय मग? असा सवाल विचारला आहे.

अयोध्या पौळ यांनी व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं की, मी हिंगोली दौऱ्यावर असातना संतोष बांगर यांनी समोर येण्याऐवजी तिथून पळ काढला. संतोष बांगर यांना चॅलेन्ज करण्याची फार हौस आहे. दोन दिवसांपूर्वी कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत 17 पैकी 17 पैकी जागा नाही आल्या तर मुछ ठेवणार नाही, असं म्हटलं होतं.

मी सकाळी उठून संतोष भांगर यांच्यासाठी रेजर गिफ्ट आणलं आहे. कधी काढतोस मुछ संतोष दादुड्या? नक्की काढ, असा सवाल अयोध्या पौळ यांनी विचारला. ज्या शिवसेनेने, ज्या ठाकरेंमुळे तुला नाव, पद, पैसा सगळं काही मिळालं. आज तू त्यांना चॅलेन्ज करतोय. म्हणून तू स्वत:च्या हाताने राजकीय करिअरला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. (Latest Marathi News)

मात्र चॅलेन्ज करताना थोडं विचार करुन करज जा. कारण हिंगोलीत आजही निष्ठांवत लोक ठाकरेंसोबतच आहे. तुझ्यासारखे पाकिटमार ठाकरेंसोबत नाही, असही अयोध्या पौळ यांनी म्हटलं आहे.

कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत 17 पैकी महाविकास आघाडीला 12 जागा तर भाजप-शिवसेनेला केवळ 5 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता आमदार संतोष बांगर शब्द पाळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

SCROLL FOR NEXT