Manmad Bajar Samiti Rada Saam Tv
महाराष्ट्र

Manmad Bajar Samiti Rada: शिर्डीतील हॉटेलवर 'हाय व्होल्टेज ड्रामा'; नेमकं प्रकरण काय? (पाहा व्हिडिओ)

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला.

Shivani Tichkule

सचिन बनसोडे

Ahmednagar News: मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. काल महाविकास आघाडीने आपले उमेदवार आणि जवळपास ४०० मतदार शिर्डीतील विविध हॉटेलमध्ये थांबवले होते. (Latest Marathi News)

यातील १६० मतदार, उमेदवार आणि काही नेते थांबलेल्या हॉटेल थ्री जी मध्ये काल रात्री ११ वाजेच्या दरम्यान अचानक मनमाड पोलीस पोहचले आणि थेट हॉटेलच्या रूममध्ये घुसून त्यांनी मविआच्या उमेदवारांना बळजबरीने बाहेर काढल्याने एकच गोंधळ उडाला.

सुमारे अर्धातास हा 'हाय व्होल्टेज ड्रामा' सुरू होता. मोठ्या गोंधळानंतर पोलिसांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. मनमाड बाजार समितीत सत्ताधारी शिवसेनेचे (Shivsena) आमदार सुहास कांदे विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पोलीस बळाचा वापर करत असल्याचा मविआ नेत्यांचा आरोप आहे. त्यातून थेट मतदारांना हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्याचा प्रकार घडला आहे.

ठाकरे गटाचे नाशिक (Nashik) ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष गणेश धात्रक, मनमाड बाजारसमितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे (NCP) शहराध्यक्ष दिपक गोगड यांच्यासह मविआचे उमेदवार आणि १६० मतदार शिर्डीतील हॉटेल थ्री जी येथे थांबलेले होते. मात्र काल रात्री ११ वाजेच्या दरम्यान मनमाड पोलीस हॉटेल थ्री जी येथे पोहचले आणि त्यांनी थेट हॉटेलच्या रूममध्ये घुसून मविआचे उमेदवार आणि अनेक मतदारांना बाहेर काढून चौकशी करू लागल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Manmad News)

सत्ताधाऱ्यांकडूनदबाव तंत्राचा वापर सुरू असल्याचा आरोप मविआ नेत्यांनी केला असून आम्ही घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीये. मोठ्या गोंधळानंतर पोलिसांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. मविआ उमेदवार आणि मतदार थांबलेल्या हॉटेलमध्ये नेमके कशासाठी आले होते. याबाबत पोलिसांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. (Maharashtra News)

मात्र मनमाड बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील हॉटेलवर हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाल्याने आज निवडणुकीदरम्यान काय काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, आज पुन्हा होणार सुनावणी

Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहि‍णी अपात्र, सरकार वसूली करण्याची शक्यता

Accident: देवघरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकची समोरासमोर धडक; १८ जणांचा मृत्यू

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी शिवभक्तांनी हनुमानाचीही करावी पुजा; हे उपाय करणं ठरेल फायदेशीर

Pune Tourism : ट्रेकिंग,सायकलिंग अन् पक्षी निरीक्षण; पुण्यातील विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT