पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या राज्यांनी लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री Saam TV
महाराष्ट्र

पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या राज्यांनी लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

'ओमिक्रॉनेबाबत सर्वांनी सतर्क राहण्याची गरज, सर्वांनी नियमांचं पालन करावं जिनोम सिक्वेन्सिंग लॅब वाढवण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. मात्र जिथे पॉझिटिव्हिटी रेट जास्त, तिथे लॉकडाऊन अथवा निर्बंध, कंटेन्मेंट झोनबाबत राज्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावे लागतील'

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : मागील महिन्यापासून ओमीक्रॉनबाबत (Omicron) केंद्राने सर्व राज्यांना गाईडलाईन्स दिल्या आहेत. मात्र ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढत असून ज्या ठिकाणी केसेस वाढतायत, तिथे केंद्राचं पथकं मदत करत आहेत. ओमिक्रॉनेबाबत सर्वांनी सतर्क राहण्याची गरज, सर्वांनी नियमांचं पालन करावं जिनोम सिक्वेन्सिंग लॅब वाढवण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे मात्र जिथे पॉझिटिव्हिटी रेट जास्त, तिथे लॉकडाऊन अथवा निर्बंध, कंटेन्मेंट झोनबाबत राज्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावे लागतील असं महत्वाचं विधान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज नाशिक येथे केलं आहे.

जिथे रूग्णसंख्या वाढतेय, तिथे ऑक्सिजन, बेड्सची उपलब्धता आणि अन्य आरोग्य सुविधांचा विचार करून राज्यांनी कठोर निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा असा सल्ला देत 23 हजार कोटींचं पॅकेज केंद्राने दिलं, मात्र केवळ 17 टक्केच निधीचा वापर केला असल्याचही त्यांनी सांगितलं. ECR 2 पी पॅकेजमधील कामं संथ गतीनं, कामांना गती देण्याची गरज असल्याच मंत्री भारती पवार (Bharati Pawar) म्हणाल्या आहेत.

हे देखील पहा -

दरम्यान रुग्णसंख्या वाढली तर महाराष्ट्र सरकारही पश्चिम बंगालसारखा (West Bengal) कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेऊ शकते केंद्राकडून सातत्याने राज्य सरकारला मदत मुंबईत सुपर स्प्रेडरसारखी परिस्थिती होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची गरज असून सध्यातरी संपूर्ण देशात लगेचच लॉकडाऊन (Lockdown) लावण्यासारखी परिस्थिती नसल्याचही त्या यावेळी म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकोटमध्ये भाजपकडून पैसे वाटप, विरोधकांचा आरोप

Suraj Chavan : येळकोट येळकोट जय मल्हार!बायकोला उचलून सूरज चव्हाण चढला जेजुरी गड, पाहा PHOTOS

Local Body Election : सर्वात मोठी बातमी! उद्या होणारी मतमोजणी रद्द, आता २१ डिसेंबरला उमेदवाराचे भवितव्य समजणार, हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Maharashtra Live News Update: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार

ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त; चांदीचे दर जैसे थे, १ तोळं सोन्याचा भाव किती?

SCROLL FOR NEXT