'तो' अर्ज माझ्या सहीचा, रश्मी ठाकरेंच्या नाही; सोमय्या दिशाभूल करतायत' Saam TV
महाराष्ट्र

'तो' अर्ज माझ्या सहीचा, रश्मी ठाकरेंच्या नाही; सोमय्या दिशाभूल करतायत'

'अर्जात कुठेही माफी मगितल्याचा उल्लेख नाही, एखादा अर्ज आपण कुठे केला की विनंती, ऋणी, आभार असे शब्द टाकत असतो. त्याचा अर्थ किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी माफी मागितली असा लावला आहे.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर -

रायगड : कोर्लई ग्रामपंचायतीकडे (Korlai GramPanchayat) घरे नावावर करण्यासाठी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर याच्यामार्फ़त अर्ज मी माझ्या सहीने केला होता रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी नाही. अर्जात कुठेही माफी मगितल्याचा उल्लेख नाही, एखादा अर्ज आपण कुठे केला की विनंती, ऋणी, आभार असे शब्द टाकत असतो. त्याचा अर्थ किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी माफी मागितली असा लावला आहे. त्याठिकाणी बंगले नसून 18 घरे होती. असे स्पष्टीकरण मुखत्यारपत्र दिलेल्या हेमंत पाटील यांनी दिले आहे.

अन्वय नाईक (Anvay Naik) यांच्याकडून जमीन खरेदी व्यवहार करताना रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांना वारंवार येणे जमणार नसल्याने मला मुखत्यारपत्र दिले होते. त्यामुळे रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या वतीने मी व्यवहाराबाबत असणारी कामे माझ्या सहीने करीत होतो. जमीन खरेदी पूर्वी जागेत अन्वय नाईक यांच्या नावे 18 घराची घरपट्टी लागली होती. मात्र त्यांना जिल्हाधिकारी यांची रिसॉर्ट बाबत परवानगी न मिळाल्याने बांधलेले जोते काढून टाकले होते.

दरम्यान 2014 ला आमचा व्यवहार झाल्यानंतर ही चार वर्षांने घराचा असेसमेंट रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे करण्यासाठी माझ्या सहीने अर्ज ग्रामपंचायत कडे केला होता. थकीत घरपट्टी ही भरण्यात आली होती. अशी माहिती हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी दिली. कोर्लई येथील जागेत असलेली घरे ही व्यवहार होण्यापूर्वीच अन्वय नाईक यांनी काढली होती. मात्र याबाबत ग्रामपंचायतकडे घरपट्टी रद्द करण्याबाबत अर्ज केलेला नव्हता. व्यवहार झाल्यानंतरही परवानगी रद्द नसल्याने ग्रामपंचायतीने कर वसूल केला.

हे देखील पहा -

मात्र ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त यांनी जागेवर जाऊन स्थळ पाहणी केल्यानंतर त्याठिकाणी घरेच नसल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे घरपट्टी रद्द करण्याबाबत अर्ज केला आणि पंचायतीने ती घरपट्टी रद्द केली. अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या घराबाबत किरीट सोमय्या हे चुकीची माहिती देत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Save Electricity : AC सोबत फॅन लावावा का? वाचा वीज वाचवण्याच्या टिप्स

Pune News: पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रेनने दिली धडक

Maharashtra Live News Update: पत्नीच्या हत्ये प्रकरणातील कैद्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातील घटना

Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

Pune Tourism : मित्रांची साथ अन् बाईक राइड, वीकेंडला पाहा पुण्यातील 'हा' मनमोहक धबधबा

SCROLL FOR NEXT