Sakshi Sunil Jadhav
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या आजही जगभर चर्चेत आहेत. 9/11 हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू, चीनचा उदय यांसारख्या घटनांबाबत त्यांनी केलेली भाकितं खरी केली आहेत. आता 2026 संदर्भातल त्यांच्या भविष्यवाण्यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे.
बाबा वेंगा यांच्या भाकितांनुसार 2026 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते. सध्याचे जागतिक राजकीय तणाव याला कारणीभूत ठरू शकतं.
चीनकडून तैवानवर वाढत असलेला लष्करी दबाव भविष्यात मोठ्या युद्धाचं रूप घेऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रशिया आणि अमेरिका यांच्यातले संबंध जास्त बिघडल्यावर जागतिक संघर्ष पेटू शकतो अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे.
बाबा वेंगा यांनी मानवजातीचा एलियन्सशी पहिला संपर्क होईल असं भाकीत केलं आहे. मात्र यामुळे जागतिक संकट येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती.
त्यांच्या मते, मानवजातीचा ऱ्हास आधीच सुरू झाला असून तो पुढील काही दशकांत जास्त तीव्र होण्याची शक्यता आहे.
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, जगाचा संपूर्ण अंत 5079 साली होईल, मात्र त्याआधी अनेक संकटांचा सामना मानवजातीला करावा लागेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.