Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिककरांनो सावधान! आजपासून विनाहल्मेट चालक रडारवर; नियमांचा भंग केल्यास कारवाई

दंडात्मक कारवाई तीव्र हाेणार; 300 अंमलदार रस्त्यावर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

Nashik News : नाशिक (Nashik) शहरात आजपासून पुन्हा दुचाकी चालकांना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक झाले आहे. हेल्मेट परिधान न करणाऱ्या चालकांविरोधात मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई होणार आहे. तसेच पाचशे रुपयांचा दंडही आकारला जाऊ शकतो. रस्ते अपघातामध्ये होणारी प्राणहानी, गंभीर अपघात व येणारे अपंगत्व यामुळे कठोर कारवाईचा निर्णय झाला आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळणे अपेक्षित आहे. परंतु, नियमांचा वारंवार भंग होत असल्याने नाईलाजास्तव कडक कारवाई करणे गरजेचे असल्याची भूमिका आयुक्तालयाने स्पष्ट केली आहे.

त्यामुळं आता नाशिककरांना दुचाकीवर घराबाहेर पडत असताना हेल्मेट बाळगणं आवश्यक झालं आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या बदलीनंतर नाशिकमधील हेल्मेट सक्तीची मोहीम थंडावली होती. मात्र, आता पुन्हा मोहिमेला सुरुवात झाली असून आजपासून शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून दुचाकी चालकांना एका आठवड्याची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्यावर आजपासून कारवाईला सुरुवात होणार आहे. जीवघेणे अपघात वाढू लागल्याने आजपासून दुचाकीस्वारांना पुन्हा हेल्मेट अनिवार्य करण्यात आले आहे.

नाशिक पोलिसांकडून शहरातील चेकिंग पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. आज शहरातील स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको कॉलेजसमोर चेकिंग होणार आहे. सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत गाड्यांची चेकिंग होणार आहे. आता पुन्हा या मोहिमेला नाशिककर कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Apple Milkshake Recipe : व्यायाम करून आल्यावर प्या 'ॲपल मिल्कशेक', दिवसभर रहाल उत्साही

Achyut Potdar Death : सिनेसृष्टीवर शोककळा, 3 Idiots मधील प्रोफेसर काळाच्या पडद्याआड

Hingoli Heavy Rain Flood : पावसाचा जोर वाढला, हिंगोलीत महापुरामुळे दोघांचा मृत्यू, मृतांच्या गावावर शोककळा

Mumbai : शाळेतून परत येताना बेस्टने उडवले, माय-लेकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT