heavy vehicle accident in phonda ghat today traffic closed for few hours  saam tv
महाराष्ट्र

Phonda Ghat Accident News : फाेंडा घाटात भीषण अपघात, जाणून घ्या वाहतुकीची स्थिती (Video)

करुळ घाटातील रस्ता मजबुतीकरण व दुप्पदरीकरणाचे काम सुरु असल्याने या घाटातील वाहतुक ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद असल्याने फोंडा घाटात वाहतुक वाढली आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

फोंडा ते दाजीपूर मार्गावर आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास 18 चाकी कंटेनरचा अपघात झाला. हा कंटनेर रस्त्यामध्येच उलटला. या अपघातात काेणतीही जिवीत हानी झालेली नाही. या अपघातामुळे फोंडा घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद (phondaghat traffic update) करण्यात आली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फोंडा ते दाजीपूर मार्गावर अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोलिस विभाग व इतर संबंधित यंत्रणा पोहोचली. या यंत्रणेच्या माध्यामतून अपघातग्रस्त कंटेनर बाजूला घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सध्या फोंडा घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे फोंडा घाटात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

दरम्यान करुळ घाटातील रस्ता मजबुतीकरण व दुप्पदरीकरणाचे काम सुरु असल्याने या घाटातील वाहतुक ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे करुळ घाटातील वाहतुक फोंडा घाट (phonda ghat), भुईबावडा घाट (bhuibavda ghat) व अनुस्कारा घाटातून (anuskura ghat) वळविण्यात आली आहे. (Maharashtra News)

आज फाेंडा घाटात अपघात झाल्याने या घाटातील वाहतुक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. सुमारे अडीच वाजता वाहतुक सुरळीत हाेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Paratha: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर पराठा; नाश्त्याचा बेत होईल भारी

By-Election: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ? उद्धव ठाकरे काय करणार?

Pune : शक्तिवर्धक औषध घेणं जिवावर बेतलं ! धावता-धावता मानसिक संतुलन बिघडलं, पोलीस भरती दरम्यान घडला भयानक प्रकार

Maharashtra Live News Update : सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस-गारपिटीचा कहर; 3 एकर पपईची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT