Weather Alert : राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस,'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी Saam Tv
महाराष्ट्र

Weather Alert : राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस,'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

भारतीय हवामान खात्याने (IMD) २८ ते ३० डिसेंबर दरम्यान विदर्भामधील काही जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला : भारतीय हवामान खात्याने (IMD) २८ ते ३० डिसेंबर दरम्यान विदर्भामधील काही जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपीट (hailstorm) होण्याची शक्यता वर्तवली होती. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास अकोल्यामध्ये (akola) अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि गारपीट झाली आहे. वेगवान वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने (rain) नागरिकांची पुरती तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसाने अचानक एन्ट्री मारल्यामुळे शहरातील बाजारपेठांध्ये (markets) जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आज सकाळपासूनच अकोला (Akola) जिल्हा आणि परिसरात वातावरणात मोठा बदल जाणवत होता. याठिकाणी सकाळपासूनच ढगाळ हवामानाची (weather) नोंद करण्यात आली होती. तसेच काही दिवसांपासून कहर करणारी कडाक्याची थंडी देखील कमी झाली होती. त्यानंतर आज दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट आणि पावसाला सुरुवात झाली आहे. अवघ्या काही मिनिटामध्ये पावसाचा जोर वाढला आणि मान्सूनच्या पावसापेक्षा देखील जोरदार सरी कोसळले आहे. शहराच्या (city) काही भागात गारपीट देखील झाली आहे.

हे देखील पहा-

सोबत विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहत असल्याने अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. बाजारपेठेमध्ये फूटपाथवर व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजी बाजारात व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस सुरू होताच शहरामधील काही भागात वीज पुरवठा देखील खंडीत झाला होता. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील कापूस, तूर, हरभरा, गहू, कांदा आणि अन्य भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकर्‍यांवर परत एकदा अस्मानी संकट कोसळले आहे.

बुलडाणा (Buldana) जिल्ह्यामध्ये देखील ढगांचा गडगडासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. शेतकरी पून्हा एकदा संकटात सापडला आहे. शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर या तालुक्यामध्ये देखील अवकाळी पावसाच्या दमदार सरी कोसळत आहे. तसेच अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर, नेवासा तालुक्यात जोरदार गारपीट होत आहे. गोदावरी नदी किनाऱ्याच्या गावात गारपिटीने मोठे नुकसान केले आहे.

यामुळे द्राक्षे, कांदा, गहू हरबऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. पुढील काही तासामध्ये पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून पुढील ३ तासामध्ये नाशिक, अहमदनगर आणि नागपुरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहेत. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आज अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर औरंगाबाद, जालना आणि गडचिरोली याठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT