Chandrapur Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Heavy Rain : चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार; मालडोंगरी येथील तलाव फुटला, गावात शिरले पाणी, शेती पाण्याखाली

Chandrapur News : विदर्भात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती असून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे सखल भागात पाणी साचलेले पाहण्यास मिळत आहे.

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. दरम्यान जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील मालडोंगरी येथील तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दरम्यान अधिक पाणी झाल्याने तलाव फुटला असून तलावातील पाणी परिसरातील शेतात गेले आहे, यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

विदर्भात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. (Chandrapur) चंद्रपूर जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती असून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे सखल भागात पाणी साचलेले पाहण्यास मिळत आहे. शेतांमध्ये देखील पाणी साचलेले पाहण्यास मिळत आहे. दरम्यान ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे मोठा तलाव बांधण्यात आलेला आहे. या तलावात पाणी साचत असल्याने परिसरातील पाण्याची समस्या मिटत असते. मात्र दोन दिवसांपासून सुरु असलेल्या (Heavy Rain) पावसामुळे तलावातील पाणी पातळीत वाढ होऊन आज दुपारच्या सुमारास तलावाचा बांध फुटला आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातल्या मालडोंगरी येथील तलाव फुटल्याने धानोली- पोहा गावात पुराचे पाणी शिरले. तलाव फुटल्याने धानोली- पोहा गावातील किमान २५ ते ३० घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर शेकडो हेक्टर जमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. मालडोंगरी हे गाव उंचावर असल्याने तलावाच्या खालच्या बाजूला असलेल्या धानोली- पोहा गावात झपाट्याने पाणी शिरले. यामुळे सध्या इथे प्रशासनाचे मदत कार्य सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Joint Pain: हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय? हे घरगुती उपाय करा

Green Moong Appe Recipe: सकाळचा पौष्टिक नाश्ता हवा मग बनवा हिरव्या मुगाचे अप्पे

Zilla Parishad Elections: मतमोजणी थांबली… आता जिल्हा परिषद निवडणुका कधी? VIDEO

निवडणुकांसंदर्भात सर्वात मोठी बातमी! जिल्हा परिषदांसाठी नवा मुहूर्त, महापालिका निवडणुका कधी?

Soham Bandekar Wedding: बांदेकर कुटुंबात नव्या 'होम मिनिस्टर'चं स्वागत, पाहा सोहमच्या लग्नातील खास PHOTO

SCROLL FOR NEXT